सावतानगरसह गोविंदनगर परिसरातही बिबट्याचा वावर
नाशिक –
शहरातील सावतानगर पाठोपाठ मुंबई नाका नजिकच्या गोविंदनगर भागात शुक्रवारी पहाटेनंतर बिबट्याचा वावर आढळून आल्याने यंत्रणेची धावपळ उडाली आहे. तसेच परिसरातील रहिवाश्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी पहाटे शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सिडकोतील सावतानगर येथील संपर्क कार्यालयाच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
सावतानगर पाठोपाठ गोविंदनगर परिसरातही बिबट्या आढळून आला. परिसरातील अशोका प्राईड इमारतीजवळ बिबट्या आढळून आल्याने नागरिक धास्तावले आहेत. हे वृत्त समजताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळते. आतापर्यंत सिडकोच्या मळे परिसरात दिसणारा बिबट्या आता थेट नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…