नाशिक

नातवासाठी आजी बिबट्याशी भिडली

खडांगळीत बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी

सिन्नर : प्रतिनिधी
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास
खडांगळी शिवारात घडली. दरम्यान, आजीने केलेल्या प्रतिकारामुळे बिबट्याच्या तावडीतून मुलाची सुटका झाल्यामुळे त्याचे प्राण वाचले. शिव संपत भोेेस (वय 6 वर्षे) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. आजी लंकाबाई पंढरीनाथ भोेस (वय 75) यांनी सर्वस्व पणाला लावत बिबट्याच्या तावडीतून नातवाची सुटका करत त्याचा जीव वाचवला. त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
खडांगळी-पंचाळे शिवरस्त्यावर निमगाव-देवपूर शिवारात संपत भोस यांची वस्ती आहे. तेथून काही अंतरावर त्यांचा एक भाऊ वास्तव्यास आहे. या भावाकडे त्यांचा मुलगा शिव सकाळी खेळण्यासाठी गेला होता. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास त्यांची आई लंकाबाई त्यास हाताशी धरून वस्तीवर परतत असताना सरपंच कल्पना नवनाथ ठोक यांच्या वस्तीजवळ सोयाबीनच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर झडप घातली. यावेळी आजीने तातडीने प्रसंगावधान राखत सर्वशक्तिनिशी बिबट्याचा प्रतिकार करत त्याच्या तावडीतून मुलाची सुटका केली. त्यानंतर जोराने आरोळी ठोकत मदतीसाठी धावा केला.
स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर बिबट्याने रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या सोयाबीनच्या शेतात धूम ठोकली. मुलाच्या पाठीला बिबट्याच्या पायाची नखे लागल्यामुळे तो जखमी झाला. त्याला तातडीने प्रारंभी वडांगळी येथील खाजगी दवाखान्यात आणि नंतर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्यासह टीमने जिल्हा रुग्णालयात जात जखमी मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक गोविंद पंढरी, वॉचमन मधुकर शिंदे, बालम शेख, रोहित लोणारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने या भागात पिंजरा लावण्यात आला आहे. तिथून दीड किलोमीटर असलेल्या धनगरवाडी शिवारातही बिबट्याला पकडण्यासाठी दुसरा पिंजरा लावण्यात आला आहे.

 

 

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago