’मविप्र समाज’तर्फे एक हजार जणांना नोकरीची सुवर्णसंधी
नाशिक : प्रतिनिधी
कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संचलित केटीएचएम महाविद्यालय आणि सीआयआय मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज, गुरुवारी (दि.12) महानोकरी मेळावा होणार आहे.
या मेळाव्यात राज्यातील शंभरहून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांसाठी सुमारे एक हजाराहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. बजाज, धूत ट्रान्समिशन, अपेक्स इंटरनॅशनल, एसबीआय कार्ड, एचडीएफसी बँक, किर्लोस्कर, महिंद्रा, व्हीआयपी, झेप्टो, ब्लिंक इट, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आदी कंपन्यांचा यात सहभाग असेल.
हा रोजगार मेळावा गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत केटीएचएम महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत होणार आहे. सकाळी 9 ते 12 उमेदवारांची नोंदणी केली जाणार आहे. यावेळी थेट मुलाखती घेण्यात येणार असल्याने उमेदवारांनी रेझ्युम, आधार किंवा पॅनकार्ड, शैक्षणिक गुणपत्रके व पासपोर्ट साइज फोटो सोबत आणावेत, असे आवाहन केले आहे.
मेळाव्याच्या दुसर्याच दिवशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान केली जाणार आहेत, अशी माहिती मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी दिली. जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे यांनी केले. अॅड. नितीन ठाकरे अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख अतिथी अॅड. लक्ष्मण लांडगे यांच्यासह मविप्रचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पात्रता ः दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर.
आवश्यक कागदपत्रे : रिझ्युम, आधारकार्ड/पॅनकार्ड, शैक्षणिक गुणपत्रके, पासपोर्ट साइज फोटो.
नोंदणी लिंक- https://forms.gle/4rWZV9LqSmfjzfsk7
अधिक माहितीसाठी संपर्क ः डॉ. डी. बी. उफाडे- 9788013127, डॉ. एस. के. तिवडे- 9888692719, डॉ. एस. एस. तावडे- 9919339379, डॉ. जे. पी. जाधव- 9889328588, के. डी. मोरे- 9604444960, एम. आर. गावळे- 9845786577
मविप्र समाज संस्थेने जिल्ह्यातील नामवंत कंपन्यांच्या माध्यमातून एक हजारांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
– अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र समाज, नाशिक
दुसर्याच दिवशी नियुक्तिपत्रे
मेळाव्याच्या दुसर्याच दिवशी मविप्रच्या ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रे प्रदान केली जातील, अशी महिती संस्थेने दिली आहे.
ठळक वैशिष्ट्ये
देश-विदेशातील शंभरपेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग.
एक हजारपेक्षा नोकरीच्या संधी.
पात्र उमेदवारांसाठी मोफत सहभाग.
मोफत उच्च तंत्रज्ञान कौशल्य विकास प्रशिक्षण
(7/15/20 दिवसांचे अभ्यासक्रम)
नियमित साप्ताहिक नोकरी मेळावे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…