नाशिकच्या जीएसटी अधिकार्यास
40 हजाराची लाच घेताना पकडले
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात लाचखोरांचे प्रमाण वाढतच चालले असून, अभोणा येथे सहायक पोलीस निरीक्षक आणि एका हवालदाराला रंगेहाथ पकडल्यानंतर पाथर्डी फाटा येथील कार्यालयातील अधिकार्यास चाळीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जगदिश सुधाकर पाटील (39) असे या अधिकार्याचे नाव आहे. तक्रारदारांचा जाहीरात चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. जाहीरात चित्रीकरणाच्या कामात व्यत्यय येऊनतक्रारदार यांचे पाच ते सहा लाखांचे नुकसान होऊ नयेे यासाठी चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून देण्याच्या मोबदल्यात जगदिश पाटील यांनी चाळीस हजारांची लाच मागीतली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. रक्कम स्वीकारताच पथकाने पाटील यांना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस नाइक प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, प्रकाश महाजन यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, नरेद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
आतापर्यंत 100 च्यावर सापळे
नाशिक विभागात आतापर्यंत शंभराहून अधिक 125 च्या आसपास लाचखोरीची कारवाई झाली आहे. जिल्हा उपनिबंधक, शिक्षणाधिकारी, तहसीलदार असे बडे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले आहेत. दररोज किमान एक कारवाई होत असली तरी लाचखोरीचे प्रमाण तसूभरही कमी झालेले नाही.
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…