ञ्यंबकेश्वर:
ञ्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी महापूजा करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे सपत्नीक उपस्थित राहीले.पहाटे झालेल्या या महापूजेस आमदार हिरामण खोसकर,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे,भाजपाचे लक्ष्मण सावजी,मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय जाधव,सुरेश गंगापुत्र,विश्वस्त भूषण अडसरे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष निलेश गाढवे,सचिव अॅड.सोमनाथ घोटेकर आणि सर्व विश्वस्त,उपसमिती सदस्य यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.महापूजा झाल्या नंतर सभामंडपात पालक मंत्री यांनी विश्वस्तांसह स्थानिक पदाधिकारी यांच्या सोबत संवाद साधला.आचारसंहिता असल्याने थेट भाष्य करण्याचे टाळले.आचार संहिता संपल्या नंतर विश्वस्त आणि पदाधिकारी यांची बैठक घेऊन मंदिर विकास कामांच्या बाबत विचारविनिमय करण्याचे संकेत त्यांनी दिले.दरम्यान महापूजा आटोपल्या नंतर भगवान त्र्यंबक राजाच्या मंदिरात सोवळे वस्त्र परिधान करत गर्भगृहात जाऊन जोतिर्लिंगाची पूजा केली.यावेळेस पदाधिकारी यांचा लवाजमा सोबत होता.