नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबर रोजी दिवशी मतदान होणार आहे. मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. 4.9 कोटी मतदार गुजरातमधील नव्या सरकारसाठी मतदान करणार आहेत. गुजरात विधानसभेत 182 जागा आहेत.