पेठ फाटा येथे कारवाई; एक जण अटकेत
सिडको : विशेष प्रतिनिधी
बंदी असलेला सुगंधित गुटखा, पानमसाला, तंबाखू व जर्दा विक्रीसाठी साठवून ठेवल्याच्या आरोपावरून पंचवटी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून 13 हजार 620 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 1 जुलै रोजी दुपारी 1.45 ते 4.50 दरम्यान श्री कपालेश्वर एंटरप्रायजेस, जनलक्ष्मी बँकेजवळ, पेठ नाका, पंचवटी येथे छापा टाकण्यात आला. अन्नसुरक्षा अधिकारी गोविंदा मोतीराम गायकवाड (वय 53) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
यावेळी प्रतीक गणेश धात्रक (वय 28, रा. बेलदार लेन, रविवार पेठ, हेमलता टॉकीजजवळ, नाशिक) याला अटक करण्यात आली.
यावेळी धात्रक याच्याकडून विमल पानमसाला 8 पॅकेट 3760 रुपये, हिरा पानमसाला 13 पॅकेट 2496 रुपये, वाह मसाला 16 पॅकेट 1920 रुपये, राज निवास सुगंधित तंबाखू 16 पॅकेट 3264 रुपये, 717 रोयल सुगंधित तंबाखू 24 पॅकेट 1152 रुपये, प्रीमियम आर.एन.01 जाफरानी जर्दा 12 पॅकेट 612 रुपये, वी. 1 तंबाखू 8 पॅकेट 176 रुपये, डब्ल्यू-च्युइंग तंबाखू 16 पॅकेट 240 रुपये असा एकूण किंमत 13 हजार 620 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीने विक्रीसाठी हा साठा स्वतःच्या ताब्यात बाळगल्याने त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.