जानोरी एमआयडीसीत 19 लाखांचे
सिगारेट व गुटखा जप्त
दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील जानोरी एमआयडीसीत पंधरा दिवसांपूर्वीच अवैद्य बायोडिझेल साठा सापडल्यानंतर आता पुन्हा पुन्हा एकदा 19 लाख रुपयांचा माल जप्त केल्याने जानोरी एमआयडीसी पुन्हा एकदा खळबळ उडाली असून दिंडोरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
जानोरी येथील अशापुरा गोडाऊन मधील एका गाळ्यामध्ये 19 लाख रुपयाचे सिगरेटचे बॉक्स व गुटखा सापडलाने जानोरी एमआयडीसी मध्ये व जानोरी परिसरात खळबळ उडाली असून याबद्दल दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.