oplus_2
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आयशरसह चालक ताब्यात
इगतपुरी : प्रतिनिधी
नाशिक-मुंबई महामार्गावरील इगतपुरी येथील अपना हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून मुंबईला जाणार्या आयशर गाडीवर कारवाई करीत 61 लाख 38 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करून 12 लाख रुपये किमतीचा आयशर ताब्यात घेतला.
आयशर गाडीतून रविवारी (दि. 1) मुंबईकडे प्रतिबंधित असलेला गुटखा जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्याआधारे नाशिक- मुंबई महामार्गावरील तळेगाव शिवारात हॉटेल अपनाजवळ आयशर गाडीची (एमएच 46 6979) झडती घेतली. त्यात प्रतिबंधित बाजीराव मस्तानी नावाचा गुटखा आढळून आला. यात 73 गोण्यांतील 61 लाख 38 हजार रुपये किमतीचा बाजीराव मस्तानी गुटख्यासह 12 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा 73 लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शरद धात्रक यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या गुन्ह्यात वाहनचालक सय्यद गफूर सय्यद गुरसाब मुल्ला (वय 37, रा. ग्राम नरोना, ता. आळण, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याला ताब्यात घेऊन इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करीत आहेत.
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…