मुक्त विद्यापीठामुळे ज्ञानगंगा घरोघरी :कोश्यारी

यशवंतराव मुक्त विद्यापीठाचा पदवीदान सोहळा

दूरस्थ शिक्षणाची गंगा अधिकाधिक लोकांपर्यत पोहचविणे आवश्यक – भगतसिंह कोश्यारी

नाशिक ः प्रतिनिधी
शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचविण्यासाठी अधिक प्रयत्न आवश्यक आहे.                                                                 या भावनेने घरोघरी ज्ञानगंगा पोहचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.असे प्रतिपादन यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलपती,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
यशवंतराव मुक्त विद्यापीठाचा 27 वा पदवीदान सोहळा मंगळवार (दि.17) आयोजित करण्यात आला होता यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दूरस्थप्रणालीद्वारे हजेरी लावली होती.त्यावेळी त्यांनी भारतात शिक्षणाची व ज्ञानाची परंपरा मोठी आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचे कार्य मुक्त व दूर शिक्षणामुळेच होवू शकते. ज्या काळी पुस्तके, ग्रंथ नव्हते त्या काळी मौखिक परंपरेतून ज्ञानाचा प्रसार होत गेला. मुक्त विद्यापीठ वेगळ्या पद्धतीने हीच थोर परंपरा दूरस्थ शिक्षण प्रणालीद्वारे प्रभावीपणे राबवत आहे. मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थीच विद्यापीठाच्या कार्याचे प्रसारक आणि प्रचारक आहेत. त्यातून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश विदेशापर्यंत विद्यापीठाचा नावलौकिक वाढत जावा, अशी अपेक्षाही राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे.पदवीदान सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भविष्यातील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

पदवीदान सोहळ्याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि कृषी वित्तीय महामंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. चारुदत्त मायी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य तथा आमदार सरोज आहिरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परिक्षा नियंत्रक भटु पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य, विद्वत परिषद सदस्य, नियोजन मंडळ सदस्य यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक उपस्थित होते.


छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या नावाने अध्यासने सुरू करावित
:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
प्रमुख अतिथी म्हणून उदय सामंत यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रापुरते,देशापुरते मर्यादित न राहता मराठी भाषीक जिथे जिथे असतील तेथे विस्तार होणे गरजेचे आहे.महाविकास आघाडीचे सरकार आपल्या प्रयत्नासाठी कायम सोबत असेल अशी ग्वाही यावेळी दिली.शिक्षणाचा विस्तार होणे गरजेचे आहे.विद्यार्थ्याना शिक्षणाचा ङ्गायदा झाला पाहीजे या हेतूने धोरण डोळ्यासमोर ठेवून काम केले जात आहे.विद
सावित्रीबाई ङ्गुले मराठवाडा विद्यापीठ नाशिकच्या उपकेंद्राचे भूमीपूजन पुढच्या पंधरा दिवसात करण्यात येणार आहे.शिक्षणासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची भूमीका नक्की घेवू हाच विश्‍वास देण्यासाठी आज येथे उपस्थित असल्याचे नमूद केले.
सावित्रीबाई ङ्गुले अध्यासन केंद्र आहे.छत्रपत्री शिवाजी महाराजांचे अध्यासन केंद्राचा आणि राजश्री शाहु महाराजांच्या महापुरुषांच्या नावाने अध्यासने सुरु करावित. या अध्यासनाच्या माध्यमातून महापुरूषांचे चरित्र व विचार विद्यार्थ्यांमार्फत समाजात पोहोचविण्यासाठी व रुजवण्यासाठी मदत होईल, असेही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. पाटील यांनी आपल्या भाषणांत त्यांनी गेल्या वर्षभरातील विद्यापीठाचा कामकाजाचा व प्रगतीचा आढावा सादर करताना विद्यापीठाला मिळालेली नॅकची अ श्रेणी, कोरोना काळानंतरची आव्हाने, ऑनलाईन शिक्षणप्रणाली, विविध नवीन शिक्षणक्रम, परीक्षा पद्धतीतील तंत्रज्ञान यासह विविध विषयांचा परामर्श घेतला.

यावेळी विद्यापीठातर्फे सुमारे एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना पदवी, चौदा हजार पदव्युत्तर पदवी, सुमारे अठ्ठावीस हजार पदविका, 150 पदव्युत्तर पदविका तर 13 विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती पदवी जाहीर करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी विद्यापीठ प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथी उदय सामंत, डॉ. चारुदत्त मायी, कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, विद्यापीठच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य, नियोजन मंडळ सदस्यांचे तुतारी व सनईच्या स्वरात मिरवणुकीने मुख्य व्यासपीठाजवळ आगमन झाले. परीक्षा नियंत्रक बी.पी. पाटील यांनी मानदंडसह या मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणूक व्यासपीठावर येताच ज्ञानगंगा घरोघरीफ या विद्यापीठ बोधचिन्हाची धून वाजविण्यात आली.
सरस्वती वंदना व विद्यापीठ गीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. प्रमुख अतिथीच्या हस्ते विद्याशाखानिहाय विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास व्यासपीठावर उदित शेठ, अनिल कुलकर्णी, प्राचार्य ज्ञानदेव नाठे, डॉ महेंद्र लामा, डॉ. जयदीप निकम, डॉ. कविता साळुंके, डॉ. प्रवीण घोडेस्वार, प्रा. डॉ. प्रकाश देशमुख, प्रा.डॉ. माधुरी सोनवणे, डॉ. सुनंदा मोरे, डॉ. प्रमोद खंदारे, यासह विविध विद्याशाखांचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमनाथ सोनवणे, शुभांगी पाटील व माधुरी खर्जुल यांनी केले.

ही आहेत विद्याशाखानिहाय सुवर्णपदके व विविध पारितोषिके प्राप्त विद्यार्थी
मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा सुवर्णपदके व पारितोषिके:
ंर्धोरण संदीप साहेबराव – कला निष्णात ( एम.ए) परीक्षेत प्रथम क्रमांक : कुलपती सुवर्णपदक
आंबुलकर भाऊसाहेब रावसाहेब (कला स्नातक, बी.ए परीक्षेत प्रथम) : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक , अहिल्याबाई होळकर पारितोषिक, सौ. हेमलता फडके व डॉ. भालचंद्र फडके पारितोषिक, लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक
ंर्काटकर उषा ज्ञानेश्वर : कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत महिला विद्यार्थ्यांत प्रथम क्रमांक – सावित्रीबाई फुले पारितोषिक, गोपाळराव मुरलीधर पंडित पारितोषिक, भीमाबाई आंबेडकर पारितोषिक
चव्हाण ऋषिकेश अविनाश – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत द्वितीय क्रमांक : अहिल्याबाई होळकर पारितोषिक
ंर् राठोड पल्लवी पंडित – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत महिला विद्यार्थ्यांत द्वितीय क्रमांक : सावित्रीबाई फुले पारितोषिक
ंर् भांदिर्गे अतुल दत्तात्रय – ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी (बी.लिब.) परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, डॉ. शां. ग. महाजन पारितोषिक
ंर् कोंडेकर अजय सदानंद – बी.ए. (वृत्तपत्रविद्या) प्रथम क्रमांक : ब्ल्यू बर्ड (इं) लि. सुवर्णपदक
ंर्मुरूमकर रोहिणी हरिभाऊ – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत मराठी विषयात प्रथम क्रमांक : कै. गोपाळराव मुरलीधर पंडित पारितोषिक, भीमाबाई आंबेडकर पारितोषिक
ंर्गिते मनीषा दशरथ – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत मानसशास्त्र विषयात प्रथम क्रमांक : कै. वंदना वसंत पुरोहित पारितोषिक, वेणूताई चव्हाण पारितोषिक
ंर्पाटील वृषाली रविकांत – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत राज्यशास्त्र विषयात प्रथम क्रमांक : लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक , वेणूताई चव्हाण पारितोषिक
ंर्वीरकर संध्या गजानन – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत इतिहास विषयात प्रथम क्रमांक : वेणूताई चव्हाण पारितोषिक
ंर्शिवणकर सागर विनायक – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत वाङ्मय प्रकार कथा-कादंबरी यात प्रथम क्रमांक : कै. कविता मेहेंदळे पारितोषिक
ंर्तांबेकर शुभम मधुकर – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत प्रबोधनपर साहित्य यात प्रथम क्रमांक : मुरलीधर वडनेरे पारितोषिक
ंर् पाटील माधवी केतन – ग्रंथालयशास्त्र निष्णात (एम.लिब.) परीक्षेत प्रथम क्रमांक: शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पारितोषिक

*वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत प्रथम क्रमांकासाठीचे दादासाहेब पोतनीस पारितोषिक खालील विद्यार्थ्यांमध्ये विभागून देण्यात आले.*
खरात मायकल जॉन, लेंगरे गणेश विलास, पानसरे विकास मारुती, दुधाळे राहुल भरमू, गुरव हर्षद विजयकुमार, माळी सारिका प्रफुल्ल, राऊत वृषाली विजय

*वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा*
ंर् हरगुनाणी रोशनी अनुप – एम. कॉम. परीक्षेत प्रथम क्रमांक थ् यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक
ंर् खंडागळे अमोल मधुकर – एम.बी.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, कै. भाऊसाहेब हिरे पारितोषिक डॉ. चिंतामणराव देशमुख पारितोषिक
ंर् वेरुळकर वृषाली महादेव – वाणिज्य स्नातक (बी.कॉम.) परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक पंडिता रमाबाई पारितोषिक, मोहनलालजी डागा सत्कारनिधी पारितोषिक, श्रीमती शारदाबाई पवार पारितोषिक
ंर्कुलकर्णी शुभम संजय – वाणिज्य स्नातक (बी.कॉम.) परीक्षेत द्वितीय क्रमांक : पंडिता रमाबाई पारितोषिक
ंर् मोहिते तृप्ती मारुती – वाणिज्य स्नातक (बी.कॉम.) परीक्षेत महिला विद्यार्थ्यांत द्वितीय क्रमांक : श्रीमती शारदाबाई पवार पारितोषिक

*शिक्षणशास्त्र विद्याशाखा*
ंर् सावंत काळबा तुकाराम – शिक्षणशास्त्र स्नातक (बी.एड.) परीक्षेत प्रथम क्रमांक: ब्ल्यू बर्ड (इं) लिमिटेड सुवर्णपदक महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक, कै. शिवाजीराव सोनार पारितोषिक
ंर् परतवाघ विद्या अर्जुनराव – शिक्षणशास्त्र स्नातक (बी.एड.) परीक्षेत द्वितीय क्रमांक : महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक

*कृषिविज्ञान विद्याशाखा*
ंर् शेख अमीर सिराज- मकृषिविज्ञान आणि उद्यानविद्या स्नातक (बी. एस्सी. ऍग्रीकल्चर /हॉर्टिकल्चर) परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक
ंर् वायाळ शारदा – मकृषिविज्ञान आणि उद्यानविद्या स्नातक (बी.एस्सी. हॉर्टिकल्चर)फ परीक्षेत प्रथम क्रमांक : डॉ. पंजाबराव देशमुख पारितोषिक व दादासाहेब पोतनीस पारितोषिक
ंर् जाधव नरेंद्र भाऊसाहेब – फळबागा उत्पादन पदविका (डिप्लोमा इन फ्रूट प्रॉडक्शन) या परीक्षेत प्रथम क्रमांक : डॉ. पंजाबराव देशमुख पारितोषिक
ंर् शेवाळे नयना हनुमंत – भाजीपाला उत्पादन पदविका (डिप्लोमा इन व्हेजिटेबल प्रॉडक्शन) ह्या परीक्षेत प्रथम क्रमांक : डॉ. पंजाबराव देशमुख पारितोषिक
ंर्खातोडे रामनाथ रंगनाथ – फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका ( डिप्लोमा इन फ्लोरिकल्चर अँड लँडस्केप गार्डनिंग) ह्या परीक्षेत प्रथम क्रमांक : पद्मसुला काकड शुभम आनंदराव – कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदविका (डिप्लोमा इन ऍग्री-बिझनेस मॅनेजमेंट) ह्या परीक्षेत प्रथम क्रमांक : प्रा. का. य. सोनवणे स्मृति-पारितोषिक
ंर् गिरे अपेक्षा संतोष – कृषि-व्यवसाय व्यवस्थापन पदविका (डिप्लोमा इन ऍग्री-बिझनेस मॅनेजमेंट) परीक्षेत द्वितीय क्रमांक : प्रा. का. य. सोनवणे स्मृति पारितोषिक

निरंतर शिक्षण विद्याशाखा
ंर्म्हात्रे साक्षी चंद्रकांत – बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज अँड केटरिंग सर्व्हिसेसफ परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक
ंर्मिस्त्री दानेश बेहराम- मबी. एस्सी. इन हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंटफ परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक

संगणकशास्त्र विद्याशाखा
ंर् गवळी करिश्मा दिलीप – मबी. सी. ए.फ परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक

ज्ञानगंगा घरोघरीफ ओळ ब्रीदवाक्य सार्थ करत विद्यापीठाने समाजातील विविध घटकांना पदवी प्रदान करण्याची परंपरा कायम राखली. या पदवीदान सोहळ्यात अंध पदवीधर चार, लष्करातील जवान 68, जेष्ठ नागरीक 192, पोलीस कर्मचारी 77, कारागृहातील बंदीजन 15 तर नक्षलग्रस्त भागातील नऊ विद्यार्थांनी पदवी प्राप्त केली आहे. या वर्षी विविध शिक्षणक्रम पूर्ण करणार्‍या एकूण 1,76,113 विद्यार्थांपैकी 20 वर्षापेक्षा कमी वयोगटातील 740, 20 ते 39 वयोगटातील 1,55,688, 40 ते 59 वयोगटातील 19,493 तर 60 पेक्षा अधिक वर्षे वय असणारे 192 विद्यार्थी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *