आमदार दिलीप बनकर व बाणगंगा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या मागणीला यश
दिक्षी : ओझर येथील मरीमाता गेट व नॅशनल हायवे गेट नं १ दरम्यानचा वहिवाट रस्ता एचएएल प्रशासनाने बंद केलेला कोरोना काळापासून बंद केला होता त्यानंतर सदर रस्त्याच्या वाहतुकीमुळे एचएएलच्या नागरी वसाहतीच्या सुरक्षेला धोका असलेबाबत कोणतेही पुरावे सादर केलेले नसल्याने व दिक्षी,दात्याणे, जिव्हाळे, थेरगांव, ओणे, कसबे व मौजे सुकेणे गांवच्या शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या १८ मार्च २००२ची राज्य शासनाची अधिसुचना ही सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिसिद्ध जागा म्हणून घोषित असली तरी जागेवरची परिस्थिती बघता एचएएल कंपनी वसाहतीमध्ये कोणताही सबंध वादांकित रस्त्याचा येत नसल्याने फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ कलम१३३ अन्वये वाहतुकीस खुला करुन देण्याचा आदेश निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ अर्चना पठारे यांनी दिला या आधिच दिला होता एचएएल प्रशासनाने त्याविरूध अप्पर जिल्हा न्यायालयातअपिल दाखल केले होते त्यानुसार अप्पर जिल्हा न्यायालयात संदिप पवार व उत्तम कदम यांनी युक्तीवाद केला की शंभर वर्ष कदाचित त्याहून जास्त वर्षापासून शेतीमालासाठी याच मार्गाने वहीवाट करत असल्याने मरीमाता गेट रस्ता वहीवाटीसाठी प्रशासनाने खुला करून द्यावा असा दावा केल्याने न्यायालयाचे अप्पर जिल्हा न्यायाधिश ए.व्ही. गुजराथी यांनी शेतकऱ्यांचे होणारे हाल व एचएएल प्रशासनाची दिरंगाई याचा युक्तीवाद ऐकूण प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे यांनी या पूर्वीचा दिलेलाच आदेश कायम ठेवत एचएएलने केलेले अपिल फेटाळले व गेट खुले करून देण्याचा आदेश एचएएल प्रशासनास गेल्या महिन्यापूर्वी दिला होता परंतु रस्ता खुला करण्याची कारवाई केली जात नसल्याने आमदार दिलीप बनकर यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकित गेट खुला करण्याचा आग्रह धरला त्यानंतर आज निफाडच्या उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या आदेशानुसार कारवाई करत ओझरचे मंडळ अधिकारी गिरीश कुलकर्णी व कामगार तलाठी यांनी एच ए एल प्रसाशन व पोलिस अधिकाऱ्यांना सोबत घेत सदर मारीमता गेट वाहतुकीसाठी खुले केले त्यामुळे दिक्षी,दात्याणे, जिव्हाळे, थेरगांव, ओणे, कसबे व मौजे सुकेणे गांवच्या शेतकऱ्यांच्या लढयाला यश आले आहे.
दिक्षी सुकेना पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने यांनी
सौ प्रतिभा धनवटे, भुषण धनवटे, रविंद्र माळोदे, संदिप जायभावे, अशोक कदम, रामभाऊ चौधरी, देविदास चौधरी, आनंद गाडे किशोर पागेरे, दत्तु बोराडे, रमेशचंद्र त घुगे, संदिप कातकाडे, आदींनी दावा दाखल केला होता तसेच अँड संदिप पवार व अँड उत्तम कदम यांनी शंतकऱ्यांच्या वतीने भक्कम जुने पुरावे व वहिवाटी बाबत बाजू मांडली ब शेतकऱ्यांसाठी मोफत न्यायालयात युक्तीवाद केला हा लढ़ा बळीराजासाठी यशस्वी केला
गेल्या दोन वर्षांपासून ओझर सुकेणा या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीस होणारी अडचण दूर होण्यासाठी शासन दरबारी अनेकदा पत्रव्यवहार केला होता अनेक वेळेस जिल्हाधिकाऱ्यांसमवेत एच ए एल कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली सोमवारी १० आक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री नामदार दादा भुसे यांच्याकडेही संबंधित विषय मार्गी लावण्यासाठी आग्रह धरला त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मारीमता गेट खुले करण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यामुळे आज शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला
आमदार दिलीपराव बनकर
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…
श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…
लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…