आनंददायी जीवनासाठी ध्यानाची गरज

श्री श्री रविशंकर महाराज : ज्ञानगंगात हजारो भाविकांकडून राम रक्षा स्त्रोत पठण

नाशिकः प्रतिनिधी
आजच्या जगात प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणाने तणावात आहे..जीवनातील तणाव कमी करत आनंददायी जीवनासाठी ध्यानाची आवश्यकता असल्याचे विचार आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री.श्री. रविशंकर महाराज यांनी व्यक्त केले.
ठक्कर डोम येथे झालेल्या ज्ञान गंगा कार्यक्रमात हजारो भाविकांकडून राम रक्षा स्त्रोत पठण केले अन् वातावरण चैतन्यमय झाले. यावेळी भाविकांना श्री श्री रविशंकर महाराज यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की , आत्मबळ हे ज्ञान,भजन, ध्यानाने वाढत असते. त्यानंतर मन सृजनात्मक होईल. तसेच काहीही करण्यासाठी उत्साह , ऊर्जा देखील निर्माण होईल.सर्वांनीच देवश्रयासाठी प्रयत्न केले पाहिजे. ध्यान, धारणा , मंत्र, पूजेने दुःख दूर होते. आपल्या पाठीमागे गुरू आहे हा भाव मनात असतो. सुखी होण्यासाठी घर घर ध्यान मोहिमेची गरज आहे. संसार हा सत्याचा काही अंश आहे. महाभारत आणि रामायणाचा भारतासह अनेक देशावर प्रभाव आहे. 8 हजार वर्षानंतरही इंडोनेशिया, रशियासह आजही अनेक देश या दोन ग्रंथांचे विचार आत्मसात करून आचरणात आणत आहे. रामरक्षा , हनुमान चालीसा, देवी कवच वाचन केल्याने आत्मिक शक्ती मिळते. चराचरात ईश्वर आहे, सतगुण वाढल्यास यश मिळते आणि पुढे यशस्वी जीवन जगता येत असल्याचे रविशंकर यांनी सांगितले. यावेळी हजारो भाविकांनी सामूहिक राम रक्षा कवच पठाण करत ध्यानाची अनुभूती घेतली. इगतपुरीत भव्य ज्ञान मंदीर होणार असून यात शिव मंदिर , ध्यानधारणा साठी भव्य हॉल आणि महाराजांची कुटिया राहील. गोविंद नगरमध्येही ज्ञान मंदीर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरांजवळ भव्य आश्रम उभारला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमात नाशिकसह देशभरातील विविध भागातील हजारो भाविकांनी सहभाग घेतला.

तीर्थक्षेत्राचा विकास भूषणावह
अयोध्यातील राम मंदिर खटला सर्वोच्च न्यायलयात होता. तेव्हा 8 महिने रोज मुस्लिम धर्मप्रमुखांशी बोलत होतो असे महाराजांनी सांगितले. सन 2003 मध्ये दिलेला 5 एकर मुस्लिम समाजाला गावाबाहेर जागेचा प्रस्ताव त्यांनी अखेर स्वीकारला. त्याला कोर्टाने मान्यता दिली. अन् दोन्ही धर्मामध्ये शांती निर्माण झाली. भारत सरकार देशातील सर्वच तीर्थक्षेत्राचा करत असलेला विकास भूषणावह असल्याचेही महाराज म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *