नाशिक

एचडीएफसी बँकेची स्टार्टअप इंडियाशी भागीदारी

मुंबई :
भारतातील इन्क्युबेशन परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी 12-15 इन्क्युबेटर्स साठी अनुदान
समाजावर सकारात्मक परिणाम करणार्या 50 स्टार्ट अप्स ना इन्क्युबेटर्स आणि मेंटर्स करणार सहकार्य
मुंबई-  एचडीएफसी बँके कडून आज त्यांच्या सामाजिक स्टार्ट अप्स बरोबरच्या वार्षिक अनुदानाच्या सहाव्या पर्वासाठी त्यांनी भारत सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या स्टार्ट अप इंडिया बरोबर भागीदारी केल्याची घोषणा केली.  परिवर्तन स्टार्ट अप ग्रान्ट्स म्हणून नावाजलेल्या उपक्रमा अंतर्गत सामाजिक परिणाम घडवू शकणार्या संस्थांना ओळखून त्यांना त्यांच्या इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून आर्थिक अनुदान दिले जाते.

हे अनुदान बँकेच्या सामाजिक उपक्रमासाठी असलेल्या  परिवर्तन या ब्रॅन्ड अंतर्गत देण्यात येणार आहे.  आजपर्यंत बँकेने 45 इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून 30 कोटी रुपयांचे अनुदान देऊन पर्यावरण, कृषी व्यवसाय, एड-टेक, वेस्ट मॅनेजमेंट, आरोग्यसेवा आणि कौशल्य विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या 165 स्टार्ट अप्स ना सहकार्य केले आहे.  बँके कडून  स्टार्ट अप्सना बँकेच्या स्मार्टअप कार्यक्रमा अंतर्गत हे सहकार्य केले जात असून यांत विशेष बँकिंग आणि व्यावसायिकांना मुल्यावर्धित सेवांचा समावेश आहे.  यामुळे स्टार्ट अप्स ना त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यास सहकार्य मिळून बँकेच्या प्रतिथयश आणि अत्याधुनिक अशा स्मार्ट फायनान्शियल टूल्स, डव्हायझरी सर्व्हिसेस आणि तंत्रज्ञनानाचा ही लाभ मिळणार आहे.

आर्थिक वर्ष 22 मध्ये आम्ही आमच्या सीएसआर उपक्रमांअंतर्गत देशभरांतील 9.6 कोटींहून अधिक लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवला आहे.  आमचे लक्ष्य हे आहे की लोकांच्या जीवनावर परिवर्तनच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सकारात्मक परिणाम घडवावा.  त्यांना स्वावलंबी आणि समाजात मिसळण्यासही मदत करावी.  आमच्या परिवर्तन स्मार्ट अप ग्रॅन्ट्सच्या सहाव्या पर्वा साठी स्टार्ट अप इंडिया बरोबर सहकार्य केल्याची घोषणा करतांना आंम्हाला आनंद होत आहे.  यामुळे समाजाशी संबंधित व्यवसायांना त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यास मदत होऊ शकेल.  असे एचडीएफसी बँकेच्या ईएसजी न्ड सीएसआर च्या प्रमुख नुसरत पठाण यांनी सांगितले.

भारत सरकार आणि इन्क्युबेटर्स ने अशा पध्दतीचा विकास केला आहे ज्यामध्ये व्यावसायिकांना त्यांच्या प्रवासात मदत होते.  ज्यावेळी समस्या ही सामाजिक किंवा एखाद्या चांगल्या कामाची गरज असते त्यावेळी ही लढाई खूपच कठीण होते, किमान सांगण्यापुरती तरी.  गेल्या 5 वर्षांत स्मार्टअप ग्रॅन्ट कार्यक्रमा अंतर्गत आम्ही समाजावर परिणाम करणार्या स्टार्ट अप्सना भेडसावणारी फंडिंगची समस्या निवारण्याचे काम करत आहोत.  या सहाव्या पर्वा मध्ये आम्ही आमच्या इनक्युबेटर पार्टनर्स बरोबर तसेच स्टार्ट अप इंडिया च्या सहकार्याने आम्ही अधिक कार्यक्षमपणे सर्वांसाठी चांगले निष्कर्श देऊ शकू. असे एचडीएफसी बँकेच्या व्हेंचर इन्व्हेस्टमेंट्स, स्ट्रक्चर्ड फायनान्स आणि सीएसआर फॉर स्टार्ट अप्सच्या प्रमुख्र नेहा अगरवाल यांनी सांगितले.

या वर्षी बँके कडून टिअर2 आणि टिअर 3 शहरांतील इन्क्युबेटर्स आणि स्टार्ट अप्सच्या क्षमतांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.  निवडक अशा इन्क्युबेटर पार्टनर्स च्या माध्यमातून बँकेकडून सामाजिक परिणमा करणार्या स्टार्ट अप्स ना पर्यावरण संवर्धन, परवडार्या आरोग्यसुविधा, शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था, सक्षम प्रशासनासाठी तंत्रज्ञान, एसएमईज साठी आर्थिक वाढ, लैंगिक विविधता आणि सर्वसमावेशकता या क्ष्रेत्रात काम करणार्या स्टार्ट अप्सना आर्थिक पुरवठा करण्यात येणार आहे.

Ashvini Pande

Recent Posts

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला   शहापूर :  साजिद शेख एका…

3 hours ago

आलिशान कारच्या काळ्या काचाआड दडले होते काय? पोलिसांनाही बसला धक्का!

अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…

9 hours ago

उज्ज्वल निकम होणार खासदार

उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…

12 hours ago

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्षपदावरून पाय उतार

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी…

1 day ago

नाशिक जिल्हा परिषदेच्या त्या अधिकाऱ्यावर अखेर निलंबन कारवाई, लैंगिक छळ केल्याच्या तक्रारींची दखल

नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर तब्बल ३० महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी…

2 days ago

येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…

4 days ago