नाशिक:एचडीएफसी बँक समूहातील दोन कंपन्या गिफ्ट सिटी-आयएफएससी मधून कामकाजाला सुरुवात करण्यासाठी तयार झाल्या आहेत. भारतातील अग्रगण्य विमा कंपन्यांपैकी एक एचडीएफसी लाइफने त्यांची आंतरराष्ट्रीय उपकंपनी एचडीएफसी इंटरनॅशनल लाइफ अँड री ची परदेशी शाखा आता एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल या ब्रँड नावाखाली गिफ्ट सिटी- आयएफएससी, इंडिया मधून अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) यूएस डॉलर मूल्यांकित जीवन आणि आरोग्य विमा उपाय सुविधा सादर करेल अशी घोषणा केली आहे. एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल एनआरआय आणि जागतिक भारतीय डायस्पोरा (देशांतरीत जनसमूह) यांना सीमांनी मर्यादित नसलेल्या जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यांसह विमा उपाय सुविधा सेवा सादर करेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही उत्पादने अमेरिकन डॉलरसारख्या परकीय चलनाचा वापर करून खरेदी करता येऊ शकणार आहेत. एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनलने सादर केलेल्या सुविधांच्या संपूर्ण श्रेणीमध्ये बचत, आरोग्य आणि सेवानिवृत्तीशी संबंधित व्यक्तीच्या आर्थिक गरजा पूर्ण करणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे.एचडीएफसी एएमसीने त्यांची पूर्ण मालकीची उपकंपनी एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडची आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) येथे स्थापना करण्याची घोषणा केली होती. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडद्वारे व्यवस्थापित केलेल्या उत्पादनांसाठी आणि सेवांसाठी जागतिक स्तरावरील पोहोच विस्तारण्यासाठी आणि नवीन बाजारपेठ खुली करण्यासाठी हे धोरणात्मक पाऊल आहे. एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेड ही गिफ्ट सिटी – आयएफएससी कडून गुंतवणूक व्यवस्थापन, गुंतवणूक सल्ला आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा प्रक्रिया करण्यासाठी आयएफएससीए मध्ये “फंड मॅनेजमेंट एंटिटी (रिटेल)” म्हणून नोंदणीकृत आहे.
एचडीएफसी लाइफ आणि एचडीएफसी एएमसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी एचडीएफसी लाइफ आणि एचडीएफसी एएमसीच्या प्रवासातील या मैलाच्या दगडावर भाष्य केले आणि ते म्हणाले, “आम्हाला भारतातील गिफ्ट सिटी मधून आमच्या ग्राहक, गुंतवणूकदार आणि भागधारकांसोबत, आमची आगामी आणि नवीन वाटचाल शेअर करताना आनंद होत आहे. युनिफाइड रेग्युलेटर आयएफएससीए संपूर्ण प्रदेश आणि संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारताला एक मजबूत आणि स्थिर आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यासपीठ म्हणून प्रस्थापित करण्यावर सतत लक्ष केंद्रित करत आहे. या सहयोगासह, आम्ही भारताच्या विकासगाथेत आणखी योगदान देण्यासाठी आणि एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल द्वारे एनआरआय आणि जागतिक भारतीयांसाठी जागतिक दर्जाचे विदेशी चलनातील विमा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक आहोत. जोडीला एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेड द्वारे जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतीय गुंतवणूक उपाय उपलब्ध करून देणे आणि निवासी गुंतवणूकदारांसाठी जागतिक गुंतवणूक उपाय उपलब्ध करून देणे यासाठीही तयार आहोत.”
गिफ्ट सिटीमध्ये नव्याने स्थापन झालेल्या एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल आणि एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडचे अभिनंदन करून गिफ्ट सिटीचे आयएएस (निवृत्त) व्यवस्थापकीय संचालक आणि ग्रुप सीईओ श्री तपन रे म्हणाले, “एचडीएफसी लाईफ इंटरनॅशनलचे गिफ्ट सिटी मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय विमा कंपनी म्हणून स्थान आणि एचडीएफसी एएमसी ऑफशोअर हब म्हणून एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडची भूमिका म्हणजे जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक उद्योगांना जागतिक दर्जाच्या व्यावसायिक पायाभूत सुविधांसाठी हब तयार करण्याच्या आमच्या बांधिलकीचे एक उत्कृष्ट प्रमाणीकरण आहे. आम्ही या सहयोगाला खूप महत्त्व देतो आणि विमा क्षेत्रात भविष्यातील यशासाठी हा उपक्रम एक मापदंड बनवण्याच्या दिशेने एचडीएफसी बँक समूहासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.”
आयएफएससीएचे आयएएस, अध्यक्ष श्री के राजारामन म्हणाले, “विविध वित्तीय संस्थांना आकर्षित करत आंतरराष्ट्रीय आर्थिक उपक्रमांचे केंद्र म्हणून आयएफएससीएचा नावलौकिक सतत वाढत आहे. आयएफएससीए नियामक चौकट पारदर्शकता, स्थिरता आणि नावीन्यपूर्ण वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेली आहे आणि जागतिक आर्थिक समुदायासाठी प्रचंड क्षमता आणि संधी आहेत.”
एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्हणाल्या, “एचडीएफसी लाइफ परदेशातील भारतीय समुदायाने भारताच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करते. आम्हाला अभिमान आहे की एचडीएफसी इंटरनॅशनल लाइफ अँड री ही आमची उपकंपनी भारतातील गिफ्ट सिटी आयएफएससी येथील शाखेतून आपली उत्पादने आणि उपाय सुविधांचा विस्तार करत आहे. ही उत्पादने अनिवासी भारतीयांसाठी योग्य असतील आणि उच्च दर्जाचे जीवन आणि आरोग्य विमा उपाय सुविधा देतील. आमच्या वितरण भागीदारांनी गिफ्ट सिटीमध्ये येऊन या योजनांमध्ये आमच्यासोबत भागीदारी करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.”
एचडीएफसी एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मुनोत म्हणाले, “एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडची एचडीएफसी एएमसीसाठी ऑफशोअर हब म्हणून झालेली स्थापना जागतिक गुंतवणूकदारांना आमच्या काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आणि उद्योगातील आघाडीच्या गुंतवणूक क्षमतांपर्यंत पोहोचण्यासाठी एक व्यापक व्यासपीठ पुरविण्याच्या आमच्या बांधिलकीला आणखी बळकट करते. जागतिक गुंतवणुक पर्यायांकडे बघणाऱ्या गुंतवणूकदारांना निवड पर्याय उपलब्ध करून देत आपल्या योजनांची व्याप्ती वाढवण्यास यामुळे मदत होईल. एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेड जागतिक गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठांशी आणि भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक बाजारपेठांशी जोडणारा पूल म्हणून काम करेल.”
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…