घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले, नंतर बायको- सासूलाही पेटवले

 

घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही…

 

 

नाशिक:  प्रतिनिधी

नाशिकमध्ये नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिन्नर तालुक्यातील सोनारी गावामध्ये ही घटना घडली.
नवऱ्याने आधी स्वत:ला पेटवून घेतलं त्यानंतर तो बायको आणि सासूच्या अंगावर जाऊन झोपला. या घटनेत दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. आरोपीने बायकोच्या घरात घुसून तिचे घर देखील पेटवून दिले. यात नवरा केदार हंडोरे याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल शिंदे (१९ वर्षे) आणि अनिता शिंदे या दोघी मायलेकी घरामध्ये झोपल्या असताना त्याठिकाणी स्नेहलचा नवरा आला आणि त्याने दोघींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. स्नेहल आपल्या आईसोबत नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावमध्ये राहते. त्याठिकाणी रात्री उशिरा तिचा नवरा केदार हंडोरे आला. त्याने आधी स्वत:ला पेटवून घेतलं त्यानंतर तो बायको आणि सासूच्या अंगावर झोपला. या घटनेमध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. केदार हंडोरेने मध्यरात्री दीडच्या सुमारास स्नेहलच्या घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकून तिचे घर पेटवून दिले. त्याचसोबत स्वत:ला पेटवून घेत त्या दोघींना देखील जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. केदार हंडोरेने असं कृत्य का केलं यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. स्नेहल आणि तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. स्नेहल ५० टक्के भाजली तर तिची आई ६५ टक्के भाजली. दोघींवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर स्नेहलचा नवरा आरोपी केदार देखील या घटनेत ७० टक्के भाजला . त्याच्यावर देखील उपचार सुरू होते. मात्र जास्त भाजल्याने त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *