अंतरीचा आवाज भाग 10
तो जेव्हा ती होते
एक दिवस अचानक मला बेंगलोर हुन फोन आला.. “ज्याने मला डान्स, नाटक मधे बघितले होते”.. यावरुन मला फिल्ममध्ये रोल देणार असे सांगून बेंगलोर ला बोलवले..
मी प्रथम नकार दिला…तर त्यांनी पुन्हा पुन्हा फोन केले..
” येण्यासाठी पैसेही मनी ऑर्डरने पाठवले”.. मग मी विश्वास ठेवून होकार दिला..
काही करुन “मला माझ्या पायावर उभे रहायचे होते”..
“स्वतःच्या नावाची ओळख हवी होती”..
कुणी माझ्या कडे दयनीयतेने बघू नये.. असे मला वाटत होते..
याआधी मी माॅडेलिंग केले पण आईचा विरोध झाला आणि ते काॅन्ट्रेक अधुरं सोडले..भावाचा विरोध झाला. तो घर सोडून वेगळे रहात होता.
“काही तरी करण्याची जिद्द मला स्वस्थ बसू देत नव्हती”..
आणि, “प्रत्येक ठिकाणी माझं किन्नर असणं आडवं येत होतं”..
आता मी ट्रेनने बेंगलोरला पोहचले ती व्यक्ती घ्यायला आली.. मी शाॅकिंग झाले..
“ही तीच व्यक्ती होती ज्याने माझ्यावर कन्याकुमारीला अत्याचार केले होते”..
मी परत घरी केरळला जायचा हट्ट धरला…
त्याचे नाव सुधीर होते त्याने माझी माफी मागितली होती.. खूप गोड बोलून लाडीगोडीत तो मला एका फ्लॅटमध्ये रहायला घेऊन गेला..
चार आठ दिवस माझ्याशी छान वागला….
नंतर मी एकटीच तिथे रहात होते.
“मी सुधीरला विचारले मी ज्या कामासाठी आलेय ते कधी होणार”… तर उत्तर द्यायला टाळत राहीला… पुन्हा मला त्याने तो
त्रास देणं सुरु केला… मी पूर्ण फसले होते…
आणि घरी परत जायला पैसेही नव्हते..
“एक दिवस त्याने एका मुलीला फ्लॅटवर आणले… तिच्यासोबत एक पुरुष होता”.. तो नंतर निघून गेला.
याने मला सांगितले कि मैत्रीण आहे.. सद्या रहायला घर नाही काही दिवस ती येथेच राहील”..
यावेळी येताना मी पुरुषांचे कपड्यावरच आलो होतो…घरात जीन्स पॅन्टवर वावरत होतो.. त्यामुळे त्या मुलीला मी मुलगाच वाटल्याने ती बोलत नव्हती.. पण ती खूप निराशेत दिसत होती..
अचानक एक दिवस सुधीर दारुच्या नशेत आला आणि तिच्यासमोर मला ब्लॅकमेल करत मारहाण केली..
साडी गजरा लावुन तयार व्हायला सांगितले.. मी घाबरून तयार झालो.. रडत होतो विनवत होतो… पण त्या मुलीला माझी दया आली.. तिने खुणवले,,तो म्हणतो तसे कर..
“नाही तर जिवानिशी जाशील”…
सुधीर गेल्यावर तिने मला सहानुभूतीने विचारले.. तूझी अशी हालत नको करु..
सुधीर वेशाव्यवसायात मुलींना अडवकतो..
“मला माझ्या लहान मुलांसाठी जगणं आणि हे रोजचच मरणं भाग आहे”
पण तु घरी परत जा.. आपण पैशाची व्यवस्था करु..
आणि तिने ओळखीच्या एका गिराईकाला बोलवले सगळे सांगितले..ते वयस्कर होते त्यांनी समजुन घेतले व पैसे देवून माझी मदत केली.. मी तिथुन पळालो आणि ट्रेन पकडून सरळ केरळ गाठले….
आई बहीणी वर अवलंबून राहावे लागू नये म्हणून मी गेलो होतो… त्या प्रचंड रागवल्या..
पण नंतर सुरळीत झालं सगळं..
मी पुन्हा कधीच कुणा पुरुषावर विश्वास ठेवू शकत नव्हते..
मी आईसोबत डान्स क्लास शिकवू लागले.. व पार्लरचेही काम करत होते..
असंच काही दिवसानंतर.. समाजिक काम करणारे आदरणीय व्यक्तीमत्व असलेले “श्रीधर”माझ्या आयुष्यात आले…
ते संस्थेचे ट्रस्टी होते.. माझ्याशी नेहमीच बोलत असे..वयाने मोठे होते.. पण त्यांच्याशी बोलायला भीती कधी वाटली नाही एवढी आपुलकीने विचारपुस करायचे…
एका कामात त्यांनी माझी मदत घेतली.
लाॅकडाऊनमधे एका वेशालयात मुलांना किडनॅप करुन स्री हार्मोन्स इंजेक्शन द्वारे देवुन त्यांना साडी घालुन वाईट काम करवुन घेणे सुरु होते…
तिथे रेड टाकण्यासाठी मला स्री बनवुन पाठवले.. पोलिस गिराईक बनुन फाॅलो करत माझ्या मागे येत होते..
आणि सापळा रचुन त्या वेशागृहावर बंदी आणली.. आम्ही त्या अल्पवयीन चाळीस मुलांना सोडवले.. उपचार केरुन,समुपदेशन करून घरी पाठवले.
पण त्यातील काही मुलांचे शरीर माझ्यासारखेच पूर्ण स्री रुपात बदलले होते.
त्यामुळे त्यांना पुढे किन्नर म्हणूनच जगावे लागले.. हे दुर्दैव होते…
अशीच हळूहळू श्रीधर व माझ्यात मैत्री वाढत गेली…
आणि एक दिवस ते माझ्या घरी आले…!
क्रमशः
सविता दरेकर
या उमेदवारांचे विजय जवळपास निश्चित दिलीप बनकर ( राष्ट्रवादी अजित पवार, निफाड ) सुहास कांदे…
नाशिक: नांदगांव मतदार संघात चौदाव्या फेरी अखेर सुहास कांदे 50230 मतांनी आघाडीवर आहेत, येथे गणेश…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण जिल्ह्यात राडा संस्कृतीमुळे गाजलेल्या नांदगाव मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे…
काजी सांगवी : वार्ताहर चांदवड देवळा मतदार संघात 8 फेऱ्या पूर्ण झाल्या आहे 8 फेऱ्या…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक पूर्व मधून भाजपचे राहुल ढिकले यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम…
नाशिक: प्रतिनिधी मालेगाव बाह्य मतदार संघातून दादा भुसे यांनी निर्णनयक आघाडी घेतल्यानंतर आता भुसे समर्थकांनी…