सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी
मुंबई:
राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं होतं. आता उद्या या प्रकरणावर घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीवेळी हे प्रकरण पाच जणांच्या घटनापीठाऐवजी सात जणांच्या घटनापीठाकडे सोपवण्यात यावे अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली होती.उद्या होणाऱ्या या सुनावणीमध्ये सत्तांतराचा तिढा सुटणार की, हे प्रकरण सुनावणीसाठी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.