लग्न, वरातीत नाचणे बेततेय जीवावर
नाशिक ः देवयानी सोनार
वयाच्या विशी पंचवीशी, पस्तीशीत तरुणांना हृदय विकाराचा धक्का बसण्याचे प्रमाण अलिकडील काळात वाढीला लागले आहे. त्यातही लग्न समारंभ, अथवा पार्टीमध्ये नाचत असतानाच ह्दयविकाराने मृत्यू होत असल्याच्या घटना घडत असल्याने वरात अथवा लग्न समारंभात नाचणेही आता जीवावर बेतू शकते.
जीवनातील ताण तणाव, लग्न न जमणे, जमले तरी टिकेल कि नाही, वाढते घटस्फोट,विवाहबाह्य संबध, नोकरी व्यवसायातील ताण, करिअर ,चांगली लाईफस्टाइल अशी लांबलचक यादी तरुणांचा हृदय विकाराचे कारण बनत आहे. कमी वयात येणारे ऍटॅक आईवडील नातेवाईकांना हादरा देणारे ठरत आहे. सर्वस्वी एकुलत्या एक,कमावत्या मुलांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटूंब उध्द्वस्त होते.
यापूर्वीच्या घटनांमध्ये नाचतांना, व्यायाम करतांना,वाद्य वाजवतांना,गाणी म्हणतांना, स्टेजवर बोलतांना, कलाकृती सादर करतांना अचानक कोसळून मृत्यू पावण्याच्या घटना वाढल्या आहे. नुकतेच सिने अभिनेत्री सुष्मीता सेनलाही हृदय विकाराचा झटका येऊन गेल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आवाजाची मर्यादा 85 डेसीबल पेक्षा जास्त झाल्यास हृदयाच्या,संपूर्ण शरीराच्या नसांवर परिणाम होतो. मोठ्या आवाजाचे शरीरावर इतरही अनेक दुष्परिणाम होतात. रक्तदाब वाढतो, डोके दुखते, घाबरल्यासारखे होते किँवा छातीत धडधडते. मोठा आवाज कानाच्या माध्यमातून मेंदू आणि शरीरापर्यंत पोहोचल्यावर हा शरीराकडून मिळणारा प्रतिसाद असतो.
डीजेमुळे वाढते हृृदयाची गती
बदलती जीवनशैली कामाचा ताण, ध्वनीप्रदुषण, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, स्थुलता, स्पर्धात्मक वातावरण अशा विविध कारणांमुळे हृदयविकाराच्या झटक्याला वयाची मर्यादा राहिलेली नाही हेच काही घटनांमधून लक्षात येते. नुकत्याच एका लग्नाच्या वरातीत नवरदेवाला हृदय विकाराचा झटका येवून त्याचा मृत्यू झाला.कारण ध्वनीप्रदूषण लग्नाच्या वरातीत कर्णकर्कश डीजेच्या आवाजाने वराच्या हृदयाची गती वाढली. परिणामी रक्ताची गुठळी होवून तीव्र झटका आला.
45 डेसीबल आवाज मनुष्य करु शकतो सहन
मनुष्य जास्तीत जास्त 45 डेसिबेलपर्यंतचा आवाज सहन करतो. त्यापुढील आवाज सातत्याने ऐकला तर त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. कानात कापूस घालणे किँवा असे उपाय करून काही प्रमाणात होणारा त्रास कमी करता येऊ शकतो. मात्र हा निश्चित स्वरूपातील उपाय नाही. डेसिबेलचा आवाज सतत तास ऐकला तर कानाला इजा होते. डेसिबेलचा आवाज ऐकला तर कानाचा पडदा तत्काळ फाटू शकतो.
85 डेसीबल पेक्षा जास्त आवाज सहन करू शकत नाही.जास्त आवाजामुळे हृदय आणि शरीराच्या इतर नसांवर ताण येवून हृदयाचे ठोके अनियमित होतात. हृदयाचय्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार होवून झटका येवू शकतो.आवाजाची मर्यादा ठेवल्यास अशा घटना घडण्याची शक्यता कमी होते.
– डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…
श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…
लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…
परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कन्सीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ,…