त्र्यंबकेश्वर येथे उष्माघात कक्ष कार्यान्वित

त्र्यंबकेश्वर ः प्रतिनिधी
उन्हाचा तडाखा वाढतो आहे. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी व पूजा विधीसाठी भाविक पर्यटकांचा ओघ वाढला आहे. या महिन्यात 38 सेल्सिअस पर्यंत उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे.
आलेल्या भाविक पर्यटकांना तसेच शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना उष्माघात पासून बचाव करण्यासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यांन्वित केला आहे. या कक्षात ऊन लागल्याने घायाळ झालेल्या रूग्णांना तातडीने अत्यावश्यक उपचार उपलब्ध होतील याची व्यवस्था करण्यात आली आहे.या कक्षात पंखा, एसी, एअर कुलर, आणि तत्सम आवश्यक सुविधांबरोबरच ओ. आर. एस. ची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, दुपारच्या वेळेस शक्यतो बाहेर पडणे टाळावे, उन्हात जास्तवेळ थांबू नये, भरपूर पाणी प्यावे, अस्वस्थ वाटल्यास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *