जिंदाल कंपनीला भीषण आग

नाशिक :

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत  भीषण आग  लागली आहे. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कंपनीत भीषण स्फोट  झाल्याने ही आग लागल्याचे समजते. आग लागली तेव्हा  कंपनीत काही कामगार असल्याचा अंदाज आहे. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून करण्यात येत आहेत.

पाहा व्हीडिओ

या कंपनीत 1000 च्या आसपास कामगार आहेत, आगीचे कारण समजू शकले नाही, आगीनंतर एकच हलकल्लोळ उडाला, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे, या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *