नाशिक : वार्ताहर
अवैध व्यवसायांविरोधी ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती देण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. अवैध व्यवसायांविषयी नागरिकांना काही माहिती द्यावयाची असल्यास ६२४२ २५६३६३ यावर संपर्क साधण्यात यावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसायांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून दि. १६ नोव्हेंबरपासून ग्रामीण जिल्हा मुख्यालयाकडून ८
पथके तैनात करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडूनही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सदर सूचनांनुसार नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व विशेष पथके यांनी दिनांक ०१ ते २३ नोव्हेंबर २२ दरम्यान दारूबंदी, जुगार, अवैध वाळू, अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
३७० संशयितांवर कारवाई
अवैध व्यवसायांविरोधी एकूण ३२१ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण रुपये १ कोटी ४५ लाख १८ हजार ५१५ रकमेचा गांजा, दारू, गुटखा, बायोडिझेल, अवैध वाळ ू रक्कम हस्तगत केली असून, एकूण ३७० संशयितांविरुद्ध कारवाई केली आहे.
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…