नाशिक: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी नवी दिल्लीत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता,अवघ्या दीड महिन्यातच त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आपण शिवसेनेत राहून न्याय देऊ शकत नाही, असे त्यांनी राजीनामा देताना म्हटले आहे. सध्या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यात शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आलेली आहे, नेते मंडळी स्थानिक यांच्यात सातत्याने अंतर्गत कुरबुरी सुरू आहेत, त्यामुळे पक्षात नवीन येणाऱ्या मंडळीना जुळवून घेणे अवघड जात असल्याने कदाचित हेमलता पाटील यांनी दीड महिन्यातच पक्षाला राम राम ठोकल्याची चर्चा आहे.