प.पू. आचार्य भगवंत पुण्यपाल सुरींश्वर महाराज यांचे महानिर्वाण

प.पू. आचार्य भगवंत पुण्यपाल सुरींचे महानिर्वाण
नाशिक | जैन धर्मियांचे विद्यमान गच्छाधीपती संघनायक व सुमारे २००० साधुसंताचे मुख्य प.पू. आचार्य भगवंत श्रीमद‌् विजय पुण्यपाल सुरीश्वरजी (७८) यांचे अल्पकालीन आजाराने मुलंड (मुंबई) वेस्ट विनानगर संघ उपाश्रयमध्ये महानिर्वाण झाले. नवकार महामंत्राचे स्मरण करता करता आज सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ७० वर्षापूर्वी वयाच्या ८ व्या वर्षी वणी जि. नाशिक येथे जैन धर्म शास्त्राप्रमाणे त्यांनी बालदीक्षा घेतली व अत्यंत अभ्यासपूर्ण अवस्थेत शास्त्रशुद्ध आचारण करून नावलाैकिक वाढविला. त्यांचे वडील आचार्य सुविशाल वात्सल्य निधी प.पू. आ.भ. महाबळ सुरीश्वरजी महाराज व आई जैन साध्वी प.पू. विमल किर्तीश्रीजी या दाेघांनी देखील दीक्षा घेतली व त्यांचे महानिर्वाण झाले. त्यांचे वणी नाशिक येथील चातुर्मास देखील गाजले व अलीकडेच नाशिक येथे प्राणप्रतिष्ठा साेहळा दीक्षा व अंजन शलाका महाेत्सव उपधानतप निविघ्नपणे पार पाडले. १ जानेवारी २०२५ राेजी नाशिक येथून विहार करून मुलुंड येथे प्रस्थान केले. त्यांच्या उपस्थितीत मुलुंड येथे मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा साेहळा २५ जानेवारी राेजी हाेणार हाेता व नाशिक येथे ३ दीक्षार्थींची माेठी दीक्षा देखील मुलंड येथे संपन्न हाेणार हाेती. त्यांच्या आकस्मित निधनाने जैन समाजातील तपागच्छ संघात अत्यंत दुखाचे वातावरण व शाेककळा पसरली आहे. नाशिकचे श्री. चिंतामणी जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ त्याचप्रमाणे वणी, सर्व संघातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांची पालखी व चढावे (बाेळी) सकाळी ९.३० वा. सुरु हाेणार असून अंत्ययात्रा सकाळी ११ वा. ऑबेराॅय इनीगमा, मुलुंड पश्चिम येथून निघणार आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिक, रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती, महाजन, तटकरे यांना मोठा धक्का

नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती गिरीश महाजन, तटकरेंना मोठा धक्का मुंबई : राज्य सरकारकडून शनिवारी (दि.19)…

5 days ago

नाशिक च्या पालकमंत्रीपदासाठी या नावावर शिक्कामोर्तब

नाशिक: प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा लागलेल्या नाशिक च्या पालकमंत्री पदावर अखेर गिरीश महाजन यांच्याच…

6 days ago

उबाठा गटाला निफाड आणि दिंडोरी तालुक्यात मोठे भगदाड

उबाठा गटाला निफाड आणि दिंडोरी तालुक्यात मोठे भगदाड २०० हून अधिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा…

6 days ago

सैय्यद प्रिंप्री रोडवर एकाचा खून

आडगाव शिवारातील विंचूर गवळी - सैय्यद प्रिंप्री रोडवर एकाचा खून सिडको: विशेष प्रतिनिधी विंचूर गवळी…

6 days ago

मनमाडला लागलेली वाहतूक कोंडीची साडेसाती कधी संपणार?

मनमाडला लागलेली वाहतूक कोंडीची साडेसाती कधी संपणार? मनमाड : प्रतिनिधी मनमाड शहर हे हे केवळ…

1 week ago

कधी कधीही घडायला नको

कधी कधीही घडायला नको अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील घरात घुसून गुरुवारी पहाटे चाकूने…

1 week ago