तरुण

हाय हाय उर्फी!

हाय हाय उर्फी!
कोणते कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. कोणत्या प्रसंगी, कोणत्या वयोगटात आपण कोणते कपडे घालावेत याबाबत अनभिज्ञता अगदी कमी जणांची असते.चुकीच्या प्रसंगी ,वयपरत्वे ड्रेसींग सेन्स् चुकू शकतो. परंतु जाणीवपूर्व देहाचे अंगविक्षेप, देहाचे प्रदर्शन,अर्धनग्नता सर्वांसमोर दाखवत फिरणे याबाबत सध्या उर्ङ्गी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद सुरू आहे. एक मुलगी मुंबईच्या रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी ज्यापद्धतीने नंगानाच सुरू आहे तो बंद व्हावा, यासाठी चित्रा वाघ यांनी आवाज उठविला.
त्यात महिला आयोगानेही उडी घेत कोणते कपडे घालणे हा वैयक्तिक बाब असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडिया किंवा सिनेमा मालिकांमध्ये अंगप्रदर्शन करणारी केवळ उर्फीच आहे का? तर नाही.
वाद बाजूला ठेवून योग्य अयोग्य बाबतीत बोलायचे झाल्यास स्त्री, महिला मग ती कोणत्याही देशातील असो तिचा सन्मान करण्यात यावा. स्त्री एक आई, मुलगी,बहिण,पत्नी,प्रेयसी,नात,अशा वेगवेगळ्या रुपात पाहिली जाते. स्त्रीला केवळ भोगवादी म्हणून पाहण्याची वृत्ती समाजाची विकृत मानसिकता दर्शविते. उर्फीच्या बिनधास्त
बोल्डनेसचे अनेकांनी समर्थनही केले आहे.शिवाय तिचा संघर्ष कसा होता आता किती संपत्तीची मालकीन आहे याबाबतही माहिती प्रसारीत केली जात आहे.अशाप्रकारे नंगानाच करून संप्पती कमावली जाते हे अधोरेखीत करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना.
सध्या सोशल मीडियावर अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.सिनेमातील अर्धनग्नता आणि विशिष्ट अंगविक्षेपाचे बळी सिनेमातील नायक नायिका नाही तर सर्वसामान्य मुलीं पडतात.त्यांच्यावर अत्याचार होतात.त्यामुळे कपडे असो वा अर्धनग्नता अशा दृष्यांवर कात्री लावली गेली पाहिजे जेणे करून समाजमनावर विपरीत परिणाम होणार नाही.असा संदेश अत्याचार झालेली तरूणी नेटकर्‍यांना नागरिकांना आवाहन करतांना दिसते.त्या तरुणीची पोस्ट विचार करायला लावणारी आहे. महिला सुरक्षा,अत्याचार रोखणे गरजेचे आहेतच परंतु  समाज कुटुंबातील सदस्य मोठ्यांचे अनुकरण करीत पुढची पिढी घडत असते.त्यामुळे स्वैराचार,बोल्डनेस कितपत बाळगावा याचे भान तरुणाईने ठेवायला हवी. संस्काराचे बिजारोपण प्रत्येक घरातून होत असते.
व्यक्ती स्वातंत्र्य असावे याबददल दुमत नाही परंतु व्यक्तीस्वातंत्र्याचा ङ्गायदा कुठे कसा घ्यावा हाही ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे.चार भिंतीत नंगानाच किंवा फोटोसेशन करून माध्यमांवर व्हारयल करून व्यक्तीस्वांतत्र्याचा डंका मिरविणे कितपत योग्य आहे.जी गोष्ट महिलांबाबत आहे तिच पुरुषांबाबतही आहे. मध्यंतरी रणबीर सिंगने न्यूड ङ्गोटोसेशनही वादात आले होते. कुठपर्यंत शरीर दाखवावे समाजभान असावे परिणामांचा विचार व्हावा.
महिलांच्या तोकड्या कपड्यांबाबत नेहमीच चर्चा होतांना दिसते.मालिका,सिनेमे,सोशल मीडिया यातून स्त्रीदेहाचे विचित्र अंगविक्षेप, कपडे अर्धनग्नता दाखविली जाते. वासनायुक्त ,आंबटशौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटेपर्यंत अशा गोष्टी पाहिल्या जातात. त्यातूनच पुढे मुली महिलंावर अत्याचार,फसवणूक,ब्लॅकमेलींगच्या घटना घडतात.

देवयानी सोनार

Ashvini Pande

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

11 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

11 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

11 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

12 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

12 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

12 hours ago