महाराष्ट्र

महामार्ग की मृत्यूमार्ग – भाग ५

डॉ. संजय धुर्जड.
9822457732
पहिल्या १०० दिवसांत ९०० अपघात नोंदवून समृद्धी महामार्ग हा मृत्यूमार्ग आहे की काय, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. त्यानिमित्त मी गेल्या काही दिवसांत याबाबतची माहिती, त्याची कारणे, त्रुटी व त्यावरील उपाय सुचवण्याच्यादृष्टीने मागील ४ भागात लेख लिहिले होते. त्या लेखांना मिळालेला प्रतिसाद, लोकांच्या प्रतिक्रिया, अभिप्राय आणि सल्ले खरोखर वाखनण्याजोग्या आहेत. त्यांनी मला यावर सविस्तर लिखाण करण्याची विनंती केली होती.
आता यावर शासन, प्रशासन व महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने काय उपाय करायला हवे, यावरही मी लिहिले होते. त्याचबरोबर बांधकामातील त्रुटी लक्षात घेऊन, काही उपाय करणे गरजेचे आहे. आपल्याला काय वाटते आहे, आपण आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.
महामार्गावरील प्रस्ताविक असलेले पेट्रोल पम्प, चार्जिंग स्टेशन्स लवकरात लवकर स्थापित करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी. त्याचप्रमाणे फूड मॉल, मोटर गॅरेज, टायर दुकान, वृक्षारोपण, वनीकरण आणि सुशोभीकरण करावे, असे अनेकांचे म्हणणे आहे. टोल नाक्यांवरील यंत्रणा अधिक सुलभ करावी. काही दिवसांपूर्वी मी या महामार्गावर प्रवास करतांना, एका टोल नाक्यावरील फास्ट-टॅग स्कॅनर निकामी झालेले होते.
त्यामुळे स्टँडबाय असलेल्या पोर्टेबल स्कॅनर ने माझ्या गाडीचे फास्ट-टॅग स्कॅन केले गेले. काही महिन्यातच स्कॅनर प्रणाली निकामी कशी होऊ शकते, याचे आश्चर्य वाटते. तरी, संबंधित अधिकारी आणि टोल वसुली कंपन्यांनी याची दखल घ्यावी व अशा तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांची अडचण व गैरसोय होऊ नये याची खबरदारी घ्यावी.
रात्रीच्या वेळी महामार्गावर गाडी चालवतांना भीती वाटते. महामार्ग सर्वच महत्वाच्या गांव-शहरांपासून काही अंतरावरून जातो. त्यामुळे आजूबाजूला लोकवस्ती दिसत नाही, उजेडही दिसत नाही. रात्रीच्या वेळी आजूबाजूचे काहीच दिसत नाही. गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात जे काही दिसते, तेच काय आपल्या नजरेस पडते. अशा काळोखाच्या आणि निर्मनुष्य रस्त्यांवर रात्रीच्या वेळी सुरक्षिततेचा विषय महत्वाचा वाटतो. या परिस्थितीचा फायदा घेत वाटमारी व दरोडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकरिता, हायवे पोलिसांचे गस्तपथक नेमावे, किव्हा CCTV कमेऱ्यांद्वारे देखरेख करता येऊ शकते. पोलीस मदतीसाठी ठिकठिकाणी हेल्पलाईन नंबरचे बोर्ड लावावेत.  या नंबरचा फायदा अपघातग्रस्त वाहनांना ही होणार आहे. अपघात झाल्यानंतर तातडीने मदत मिळाली, व लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळाल्यास प्राणहानी कमी केली जाऊ शकते. यासाठी महामार्गावर ठीकठिकाणी इमर्जन्सी कॉलिंगसाठी फोन नंबरचे बोर्ड लावावे. किव्हा १०८ नंबरवर कॉल करून मदतीसाठी अँबुलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी.
महामार्गावर ठराविक अंतराने वैद्यकीय सेवा देण्यासाठी फर्स्ट एड क्लीनिक्स, हॉस्पिटल्स, रक्तपेढी… ई. सुरू करण्यात यावे. गोल्डन-आवर मध्ये उपचार मिळणे गरजेचे असते. यामुळे रुग्णाचे प्राण तर वाचणार आहेतच, परंतु प्रकृती जास्त खालावण्याच्या आत जर उपचार सुरू केले तर अनेक कॉम्प्लिकेशन्स टाळता येऊ शकतात.
तेथील हॉस्पिटल्स मध्ये कुशल डॉक्टर्स व स्टाफ, त्याचसोबत बेसिक परंतु, आधुनिक उपकरणे असावी. प्रथमोपचार करून अपघातग्रस्तांना जवळच्या मोठ्या शहरातील विविध सोयीसुविधा असलेल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची ठिकठिकाणी व अशा केंद्रांवर अँबुलन्सची सुविधा देखील महत्वपूर्ण सिद्ध होऊ शकते. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे प्राण गमावल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या आणि बघितल्या असतील. त्यामुळे, लवकरात लावजर वैद्यकीय आस्थापने उभे करावे, असे अनेकांचे मत आहे.
मी माझ्या मागील लेखात “मोटर क्लिनिक” ची संकल्पना मांडली होती. त्यानुसार, माणसांसोबतच गाडीचीही तपासणी करणे आवश्यक आहे. तिथे गाडीची कंडिशन, सर्व्हिसिंग केली आहे की नाही, टायर, हेडलाईट, हॉर्न, ब्रेक्स, इंजिन / ब्रेक ऑइल लेवल, पेट्रोल / डिझेल लेवल, वाईपर्स, इन्शुरन्स पेपर्स, पियुसी, ड्राइविंग लायसन्स, चेक केले जाईल.
हायवे वर ती गाडी चालण्याच्या स्थितीत आहे अगर नाही, हे लक्षात येईल. तसेच, त्यात काही बिघाड झालेला असल्यास त्यावर योग्य ती दुरुस्ती करता येईल. भविष्यात सार्वजनिक वाहतूक सेवा (बस सेवा) सुरू करण्याची योजना आहे, असे कळले. अशा सुविधेमुळे सर्वसामान्यांना लांबचा प्रवास, कमी खर्चात, कमी वेळेत, व जलदगतीने करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तरी अशी सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी.
योजनेप्रमाणे, वृक्षारोपण करण्याचे असल्यास ते त्वरित करण्यात यावे, अशी मागणी काहींनी केली आहे. वृक्ष वाढीसाठी वेळ लागणार आहे. बदलते हवामान, वाढते तापमान आणि वातावरणातील अनियमितता नियंत्रित करायचे असल्यास, वृक्ष लागवड आणि वनीकरण त्यावरील ठोस उपाय आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे.
महामार्गच्या माध्यमातून शेतीमाल वाहतुकीसाठी प्रोत्साहन द्यावे. भाजीपाला, फळभाज्या, फळे विक्री होईल, तसेच शेतीवर अवलंबित उद्योगांनाही गती मिळेल. शेतकऱ्याला आपला शेतमाल हव्या त्या बाजारात विकण्याची सुविधा मिळाल्याने दोन पैसे जास्त मिळू शकतात. बळीराजा सुखी तर राज्य सुखी. हे सुखाचे दिवस आणणे, शासनाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. परंतु, राज्यातील राजकीय सद्यस्थिती बघता, या सुचनांकडे बघायला कुणाला वेळ तरी मिळेल का, हाच मूळ मुद्दा आहे… लिहिण्यासारखे खूप आहे, परंतु शहाण्याने समजून घ्यावे…!!! (समाप्त)
Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago