इंदिरानगर ; वार्ताहर
हिमाचल प्रदेश येथे मित्रांसोबत सहलीसाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कौस्तुभ हुदलीकर असे या तरुणाचे नाव आहे.
इंदिरानगरचे रहिवाशी असलेले नाशिक मधील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक , सावाना सांस्कृतिक समितीचे सदस्य संतोष हुदलीकर यांचा तो मुलगा होय. तो आणि त्याचे दोन तीन मित्र पाच दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेश मध्ये फिरण्यासाठी गेले होते. दिनांक २५ रोजी हिमाचल मधील लाहौल – स्पाटी जिल्ह्यातील समुद्र सपाटीपासून दोन हजार फूट उंचीवर असलेल्या काजा या शहरात ते फिरत होते .अति उंचीमुळे ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा न झाल्याने ते खाली कोसळले. त्यांच्या मित्रांनी त्यांना स्थानिक रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचारानंतर ते सावध झाले. व्यवस्थित झाले असे वाटत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
साधारण दोन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याला नऊ महिन्यांचा मुलगा आहे. एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्या निधनाने परिवारावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा आई-वडील असा परिवार आहे . दिल्लीहून मुंबई मार्गे त्याचे पार्थिव नाशिकमध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंदिरानगर येथील निवासस्थातून त्याची अंत्ययात्रा निघणार आहे.
येवल्यात ईको कार व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात एक ठार ;एक गंभीर जखमी येवला :…
मुंबई: बॉलिवूड अभिनेत सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात चोराने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक…
मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…
इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…
सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…