शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू
सिडको : दिलीपराज सोनार
जुने सिडको परिसरातील शॉपिंग सेंटरच्या बाजूला झोपलेल्या एका व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर व्यक्ती झोपलेला असताना एका अज्ञात वाहनाचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.ऐन भाऊबीजे सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मृत व्यक्तीचे नाव अर्जुन तुळशीराम महाजन (वय ४२) असे असून तो या परिसरातीलच असल्याचे समजते. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून हा प्रकार हिट अँड रन असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत