मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयदत्त होळकर यांनी ना भुजबळांची सोडली साथ

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयदत्त होळकर यांनी ना भुजबळांची सोडली साथ

लासलगाव:समीर पठाण

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसी समाजात समावेश करण्याची आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे.जरांगे पाटील यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे.या मुद्यावरून जयदत्त होळकर यांनी ना भुजबळांची साथ सोडली असून होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे

जयदत्त होळकर हे भुजबळांचे खंदे समर्थक मानले जातात मात्र त्यांनीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांची साथ सोडल्याने भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत.मराठा आरक्षणाला मंत्री भुजबळ विरोध करत असल्याने मी राजीनामा दिला असल्याचे जयदत्त होळकर यांनी स्पष्ट केले आहे.निफाड तालुका पूर्व 46 गाव तालुकाध्यक्ष पदाचा होळकर यांनी राजीनामा दिला आहे.पुढे आता फक्त मराठा समाजासाठी काम करण्याची भूमिका घेतली आहे.मराठा समाजाचा झेंडा हाती घेतला आहे अशी प्रतिक्रिया होळकर यांनी व्यक्त केली आहे.

भुजबळ यांचे समर्थक असलेल्या मराठा नेत्यांनीच भुजबळांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे.थेट राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लासलगावसह 46 गावातून मतांची गोळा बेरीज करताना भुजबळांची चांगलीच दमछाक होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *