आस्वाद

होमेथॉन 2022 प्राॅपर्टी एक्स्पो

 

स्वप्नातील घर घेण्याची संधी

 

विकासाचा प्रचंड वेग असलेल्या आणि तरीही स्वच्छ हवा, रमणीय पर्यावरणचं लेणं लाभलेल्या नाशिक स्मार्टसिटीत घर घेणं हे केवळ नाशिककरांचंच नाही तर मुंबई पुण्यासारख्या शहरातील कित्येकांचं स्वप्न असतं.आता हे स्वप्न होमेथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. कॅपिटल सिटी मुंबईच्या जवळ, सांस्कृतिक पुण्याच्या शेजारी समृद्धी महामार्गाच्या जाळ्यात असलेल्या सुवर्ण चतुष्कोनातील महत्वाचं शहर नाशिक! रुद्राक्ष ते द्राक्ष आता वाईन इंडस्ट्री ते देशाचं कृषी तसंच शैक्षणिक हब! नाशिक “किचन ऑफ इंडिया” देखील आहे. नाशिकचा सर्वांगीण विकास होतोय, त्यामुळेच हे शहर लोकांना राहण्यासाठी भुरळ घालतंय. आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे कारण २२ ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत नरेडको नाशिक आयोजित होमथॉन २०२२प्रॉपर्टी एक्स्पो हे नाशिकमधील सगळ्यात भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन होणार आहे.

प्रदर्शन प्रॉपर्टीचं असलं तरी संबंधित अन्य क्षेत्रात आर्थिक चलनवलन मोठ्या प्रमाणावर होत असते आणि हाच असतो शहराचा विकास! शहराच्या विकासाच्या वेगात बांधकाम क्षेत्राचा मोठा वाटा असतो, नाशिक झपाट्याने विस्तारत आहे, या डायनॅमिक सिटीत स्वत:च्या वास्तू तसंच जागेचं स्वप्न लवकरच विनासायास पूर्ण होणार आहे नरेडकोच्या निमित्ताने.

 

 

नरेडको म्हणजे “नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल” हि सेंट्रल गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट यांची संस्था आहे. रियल इस्टेट डेव्हलपर्सना बरोबर घेऊन बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी संस्थेमार्फत सरकार पर्यंत पोहोचवाव्यात त्यांचं निराकरण व्हावं अशी तिची मूळ संकल्पना आहे. नरेडकोच्या स्थापनेमागे आणखी एक कारण आहे, गव्हरमेंटच्या बांधकाम क्षेत्रातील ज्या संकल्पना असतात त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी डेव्हलपर्सनी काम करावं. ग्राहकांच्या अडचणी गव्हरमेंटपर्यंत पोहोचवाव्यात हा या मागचा उद्देश आहे. नरेडको हा एक प्रकारे आणि ग्राहक यांच्या मधला दुवा आहे. नरेडको च्या भारतभरात शाखा आहेत. महाराष्ट्रात आहेत, त्यातील नरेडको नाशिकच्या वतीने नाशकातील सगळ्यात भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशन २२ ते २५ डिसेंबर या कालावधीमध्ये डोंगरे वसतीगृह मैदान, जुना गंगापूर नाका, नाशिक या ठिकाणी होत आहे.अपार्टमेंट्स, शॉप्स, ऑफिसेस यासाठी स्मार्ट सिटी नाशिक मध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे. “लिव्ह – इन्व्हेस्ट – ग्रो” हि नरेडकोच्या पहिल्या प्रदर्शनाची संकल्पना असल्याचं नरेडको नाशिकचे अध्यक्ष  अभय तातेड यांनी सांगितलं आहे.

 

नगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्याकडून दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमधे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे कायम होत असतं. पायाभूत सुविधांची रेलचेल असलेल्या नाशिकला समृद्धी एक्सप्रेस हायवे लागलेला आहे. सुरत चेन्नई एक्सप्रेस वे, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे होऊ घातली आहे, मुंबई नागपूर बुलेट ट्रेन, नाशिक निओ मेट्रोचे नियोजन देखील सरकारने केलेलं आहे, अलीकडेच इमिग्रेशन काउंटर नाशिकला मान्यता मिळाली असल्याने आंतरराष्ट्रीय विमान इथे थांबतील त्यामुळे नाशिकमध्ये येणारा वर्ग आता महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून येण्यास उत्सुक असतांना नाशिकची आणखी एक खासियत लोकांना भूरळ घालत असते, महाराष्ट्रातील पर्यावरण स्नेही आणि हरित शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. इथे शहराच्या विकासाच्या वेगाशी स्पर्धा करीत वृक्ष लागवड – संवर्धनासाठी मोठ्याप्रमाणावर काम होत असतं त्यामुळेच इथला प्रत्येक ऋतू हवाहवासा असतो, या देखण्या शहरात रहायचं स्वप्न असणाऱ्या प्रत्येकासाठी सुवर्ण संधी घेऊन आलंय नरेडको नाशिक होमेथॉन एक्स्पो २०२२ ! व्यावसायिकांसाठी देखील इथे फार मोठ्या संधी आहेत. नाशिकचे हवामान हे कायम निवासाकरिता आरोग्यदायी आहेच सोबत इथे सातत्याने इंडस्ट्रियल वाढ होत असल्याने बाहेरगावच्या नागरिकांचा नाशिकमधे स्थायिक होण्याचा कल वाढलेला आहे असं नरेडको होमथॉन एक्स्पो २०२२ एक्सोपोचे समन्वयक  जयेश ठक्कर यांनी सांगितलं.

 

 

नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे सगळे प्रकल्प एकाच छताखाली ग्राहकांना नरेडकोच्या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. “बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना इथे विशेष सवलती असतील, बँकिंग पार्टनर्स देखील ग्राहकांना विशेष सवलत देणार आहेत. स्पॉट बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक चांदीचं नाणं या ठिकाणी भेट मिळणार आहे जितके लोक एक्झिबिशन बघायला येतील त्यापैकी एका भाग्यवंताला चांदीचं नाणं दररोज मिळणार आहे”. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे असून सह प्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो,केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.असं संस्थेचे सचिव  सुनील गवादे यांनी सांगितलं,

 

 

प्रॉपर्टी व्यतिरिक्त याठिकाणी बांधकाम मटेरियल, इंटिरियर मटेरियलचे स्टॉल असणार आहे. विविध बँकांच्या स्कीम सवलती सुविधा इथे ग्राहकांना एकाचवेळी समजतील. हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून नाशिक, मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरीकांना उपलब्ध होईल,अल्प व मध्यम उत्पन्नगटातील लोक केंद्रबिंदू धरून अगदी १५ लाखांपासून ते ४ कोटी रुपया पर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरीकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.मुख्य म्हणजे या प्रदर्शनासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आलेलं नसल्याचं संस्थेचे सहसचिव शंतनू देशपांडे यांनी सांगितलं.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हि नरेडकोच्या होमथॉन एक्स्पो २०२२ या प्रदर्शनासाठी ब्रँड ॲम्बेसिडर आहे.त्या देखील या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन नरेडकोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बांधकाम क्षेत्रातील अर्ध्वयू डॉक्टर निरंजन हिरानंदानी आणि नरेडको नॅशनल प्रेसिडेंट श्री. राजन बांदलकर यांच्या हस्ते होणार आहे.

दीपक बिल्डर्स आणि डेव्हलपर नरेडको नाशिक होमथॉन एक्स्पो २०२२ चे स्पॉन्सरर आहेत. दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे यांनी “मॅक्स चॉईसेस – मॅक्स प्रॉपर्टीज” असलेल्या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन केलं आहे.आपल्या स्वप्नातीलघर घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असून नागरिकांसाठी होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो हे प्रदर्शन एक पर्वणीच असणार एवढे मात्र नक्की

अभय ओझरकर
९८९०३७७२७४

Ashvini Pande

Recent Posts

अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…

3 days ago

मालेगाव शहरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…

3 days ago

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा डंका

श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…

3 days ago

डॉ. नीलम रहाळकर यांचे उद्या ‘अरंगेत्रम्’; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना

डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…

3 days ago

कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ

कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…

4 days ago

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

5 days ago