महाराष्ट्र

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

निफाड: प्रतिनिधी
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कायदा सुव्यवस्था प्रश्‍न निर्माण झाल्याचे चित्र आहे. शहरात आज वेगवेगळ्या भागात दोन खुन झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच अल्पवयीन मुलीवर दोन नराधमानी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाल्याने संताप व्यक्त होत  आहे. निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले असून कोणाला काही सांगितले तर तुझ्या भावाला मारून टाकू, शाळेत तुझी बदनामी करू अशी धमकी दिली या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . या प्रकरणी पोलीसांनी दोघा नराधमांना अटक केली आहे. समाधान संगमनेरे राहणार खेरवाडी व संतोष उर्फ केदु उर्फ केरू बेंडकुळे राहणार खेरवाडी अशी दोन्ही नराधमांची नावे आहेत. शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरी बोलवून   सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घडना उघड झाली आहे.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपाधिक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार सायखेडा पालीस ठाण्यात भा द वि कलम 376(ड),376(ड) (अ),452,506,34 लैगिंक अपराधपासून बालकांचे संरक्षण अधिनियमन 2012 चे 4 व 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी तपास करत आहेत.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago