शुक्रवार, ३० डिसेंम्बर २०२२.
पौष शुक्ल अष्टमी, हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस आहे” दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सव आरंभ.
नक्षत्र: उत्तरा भाद्रपदा
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आध्यत्मिक उन्नती होईल. जीवनाचा अर्थ कळेल. कोर्ट कामात यश मिळेल. दबदबा वाढेल. भौतिक सुखे मिळतील. मन प्रसन्न राहील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम अथिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन प्रसन्न राहील. कामाचा वेग वाढेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कोर्टात यश मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे.  बौद्धिक  कामात वेळ व्यतीत कराल. कामाचा ताण वाढेल. अंगावर अधिक जबाबदारी येईल. अर्थात अंतिमतः त्यातून लाभ मिळतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) जेष्ठ व्यक्तींकडून लाभ होतील. नात्यात संवाद होईल. प्रवासाचे बेत आखले जातील. उच्च शिक्षणात यश मिळेल. शेअर्स मधून लाभ होऊ शकतात.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पीडा दायक दिवस आहे. आरोग्य सांभाळा. उष्णतेचे विकार संभवतात. व्यसने टाळा. विश्रांती घ्या. औषधे घेताना काळजीपूर्वक घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रेमात यश मिळेल. मात्र इतर ठिकाणी विनाकारण दोषारोप होऊ शकतो. तुमची बाजू भक्कम पणे लावून धरा. भागीदारी व्यवसायात बारीक लक्ष घाला.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. कलाप्रांतात चमक दाखवाल. व्यावहारिक प्रगती होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. रोजचे काम चालू ठेवा. नवीन प्रकल्प सध्या नको. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरात वातावरण अस्वस्थ राहू देऊ नका. हितशत्रू त्रास देतील. प्रलोभने टाळा. कठोर बोलणे नको. शेतीतून उत्पन्न वाढेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वेळ दवडू नका. भौतिक लाभ होतील. आनंददायक घटना घडतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वाहनविक्री मधून लाभ होतील. सुवासिक द्रव्यवापर कराल. खर्चात वाढ होणार आहे. मात्र तुमच्या शब्दास मान मिळेल. जामीन राहू नका. जपून आणि मोजके बोला.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूलता वाढीस लागणार आहे. कामांचा वेग वाढेल. ध्यानधारणा करा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आध्यत्मिक उन्नती होईल.
. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
Devyani Sonar

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago