गुरूवार, २०ऑक्टोबर २०२२.
अश्विन कृष्ण दशमी शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“दुपारी ४ नंतर चांगला दिवस
चंद्र नक्षत्र -आश्लेषा
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील मात्र खर्चात वाढ संभवते मात्र आवक हि होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्याची काळजी घ्या. वाद टाळा. कामाच्या ठिकाणी एकाग्रता करा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यांतीक सुखाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. धनलाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) फारसा अनुकूल दिवस नाही. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. उपासना करा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. दुपारनंतर कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज अनुकूलता नाही. खर्च वाढतील. विश्रांती घ्या. कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल .
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) यश आणि कीर्ती देणारा कालावधी आहे. सन्मान मिळतील. व्यसने टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. कमी बोलणे हिताचे आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नेहमीची कामे चोख पार पाडाल. महत्वाची कामे आज नकोत. मन शांत ठेवा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विश्रांतीची गरज आहे. राजकारणात पडू नका. मोजके बोला.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामानिमित्त दगदग होईल. यश लाभेल. विरोधक पराभूत होतील. संयम राखा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. दीर्घकालीन करार होईल. नवीन ओळखी होतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –