रविवार, २७ नोव्हेंबर २०२२.
मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी, हेमंत ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे. *विनायकी चतुर्थी*
चंद्र नक्षत्र – पूर्वा आषाढा (दुपारी १२.३८ पर्यंत) नंतर उत्तरा आषाढा नक्षत्र.
मेष:- उच्च शिक्षणात यश मिळेल. प्रवासाचे बेत आखाल. मौल्यवान खरेदी होईल. प्रसन्न कालावधी आहे. दुपारी विनाकारण एखादे काम अंगावर येईल.
वृषभ:- भौतिक सुखे मिळतील. धनलाभ होईल. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल. भाटीगाठी होतील. मात्र थकवा जाणवेल.
मिथुन:- पूर्वार्ध अनुकूल आहे. मात्र गैरसमजातून त्रास संभवतो. प्रेमात यश मिळेल. वाहने जपून चालवा. यंत्र सामुग्री हाताळताना काळजी घ्या.
कर्क:- आर्थिक घोडदौड चालूच राहील. चैनीवर खर्च कराल. व्यसने टाळा. प्रेमाचा आविष्कार अनुभवाल. खुश खबर मिळेल.
सिंह:- संतती संबंधित शुभ समाचार समजतील. विरोधक पराभूत होतील. उत्तरार्ध आर्थिक लाभाचा आहे. कठोर भूमिका घ्याल. आरोग्य सांभाळा.
कन्या:-आर्थिक आघाडी मजबूत होईल. प्रगतीचा कालावधी आहे. मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. आनंददायक घटना घडतील.
तुळ:- मन प्रसन्न करणारा दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक आवक होणार आहे. वास्तूची कामे मार्गी लागतील. शेतीतून लाभ होतील. नविन खरेदी होईल.
वृश्चिक:- आर्थिक आवक आणि जावक सारखीच राहील. चैनीवर खर्च कराल. उत्तरार्ध अनुकूल आहे. नवीन संधी चालून येतील. नात्यात वाद होऊ शकतात.
धनु:- मन आनंदित करणारा दिवस आहे. विजयी व्हाल. मित्रमंडळी भेटतील. शब्दाला मान मिळेल. कणखर भूमिका घ्याल.
मकर:- आर्थिक प्राप्ती होईल. प्रसंगी तुम्ही आज तडजोड कराल. मित्र अडचणीत आणू शकतात. भौतिक सुखे लाभतील. घाईने निर्णय घेऊ नका.
कुंभ:- आर्थिक लाभ होतच आहेत. मना सारखी कामे पार पडतील. धावपळ वाढेल. वाहन जपून चालवा.
मीन:- नेहमीचे कामकाज चालू राहील. ग्रहमान तुम्हाला आनंद आणि सुख प्रदान करतील. दबदबा वाढेल.
मंगेश पंचाक्षरी –