राशी भविष्य

गुरूवार, १ डिसेंम्बर २०२२.

मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी/ नवमी, हेमंत ऋतू.

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

“आज क्षय दिवस *दुर्गाष्टमी* ”

चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूलता नाही. नेहमीची कामे पूर्ण करा. दानधर्म कराल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम लाभाचा दिवस आहे. अडथळे दूर होतील. कामात प्रगती होईल. व्यवसायात यश मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामात चालढकल नको. अचानक धनलाभ होऊ शकतो. संमिश्र दिवस आहे.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्यदायी दिवस आहे. मन शांत ठेवा. वादविवाद टाळा. स्पष्ट भूमिका घ्या. संध्याकाळ चिंता वाढवणारी असू शकते.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवस संमिश्र आहे. महत्वाची कामे आज नकोत. कुलदेवतेची उपासना करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कठोर बोलणे टाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अडथळे दूर होतील. मार्ग सापडेल. यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. अडचणींवर मात करा. संयम ठेवा. सरकारी कामात चालढकल नको.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरात काही महत्वाचे बदल कराल. भावंडकडून लाभ होतील. मन स्थिर ठेवा. सामंजस्याने परिस्थिती हाताळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम लाभ होतील. अंतर्मुख व्हाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मार्ग सापडतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सद्गुरू सान्निध्य लाभेल. अध्यात्मिक उन्नती होईल. लाभदायक दिवस आहे. कोडी सुटतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संयम ठेवा. प्रगतीस उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील. नवनवीन ओळखी होतील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *