राशी भविष्य

सोमवार, ५ डिसेंम्बर २०२२.

मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी, हेमंत ऋतू

राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

आज उत्तम दिवस आहे. *सोमप्रदोष*

चंद्र नक्षत्र – अश्विनी/भरणी

मेष:- तुमची परीक्षा बघणारा दिवस आहे. क्रोध टाळणे उत्तम. यश मिळेल. स्पर्धेत पुढे जाल. राजकारणात यश मिळेल. सरकारी कामात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल.

वृषभ:- कर्जे मंजूर होतील. पैशांची तजवीज होईल. दानधर्म करण्यास चांगला कालावधी आहे. व्यसने टाळा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मिथुन:- आर्थिक लाभ होतील मात्र त्यासाठी काही काळ वाट बघावी लागेल. घरातील जेष्ठ व्यक्तींकडून मोलाचा सल्ला आणि अनेक आशीर्वाद मिळतील. सौख्य लाभेल.

कर्क:- घरात कुरबुरी होऊ शकतात. संमिश्र दिवस आहे. गुंतवणुकीतून लाभ होतील. गुरू सन्निध लाभेल.

सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. खरेदी होईल. विरोधक पराभूत होतिल. स्पर्धेत यश मिळेल. उच्च शिक्षणात प्रगती होईल. योग्य निर्णय घ्याल.

कन्या:- जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. शेअर्स मधून फायदा होऊ शकतो. उद्योग व्यवसायात वृद्धी होईल. दीर्घकालीन नफा मिळेल.

तुळ:- कामाची गडबड राहील. काही महत्वाचे निर्णय आज घ्यावे लागतील. योग्य सल्ला घ्या. व्यसने आणि प्रलोभने टाळा.

वृश्चिक:- आर्थिक प्रगती होईल. जोडीदाराकडून किंवा सहकाऱ्याकडून मत्सर त्रास जाणवेल. शेतीची कामे पुढे सरकतील. जमिनीच्या व्यवहारातून लाभ होतील.

धनु:- संततीला समजून घ्या. आर्थिक लाभ होतील. नात्यातून मदत मिळेल. पराक्रम गाजवाल. धाडसी निर्णय घ्याल. घरात संवाद साधा.

मकर:- खाणी संबंधित कामे मार्गी लागतील. वेळ दवडू नका. घरात लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.

कुंभ:- प्रगतीचा दिवस आहे. मना सारखी आवक होईल. कामाचा उरक आवश्यक आहे. वेगाने वाटचाल कराल. काही कामे रेंगाळतील.

मीन:- निराश होऊ नका. उपासना करा. चिकाटी सोडू नका. कामाचे स्वरूप पूर्णपणे समजावून घ्या

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Devyani Sonar

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

1 day ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

1 day ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

1 day ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

1 day ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

1 day ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

1 day ago