शुक्रवार, १६ डिसेंम्बर २०२२

. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी, हेमंत ऋतू. राशिभविष्य –

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

चंद्रनक्षत्र – पूर्वा/उत्तरा फाल्गुना

“आज चांगला दिवस आहे.”

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक यश मिळेल. मात्र त्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. लेखनातून यश मिळेल. धाडसी निर्णय घेताना काळजी घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खनिज आणि जमीन संबंधित कामे रेंगाळतील. पशूंपासून सावध रहा. सासुरवाडी कडून लाभ होऊ शकतात.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. छोटे प्रवास घडतील. जोडीदारा कडून सुख लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्चात वाढ होऊ शकते. मात्र खर्च योग्य कारणासाठी होईल. त्यातून दीर्घकालीन लाभ होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) गूढ उलगडले जाईल. गुरुसान्निध्य लाभेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडून फायदा होऊ शकतो.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. महत्वाचे करार आज नकोत. घरात वादविवाद होऊ शकतात. आरोग्य सांभाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामाच्या ठिकाणी वरिष्ठ खुश होतील. मनासारखी बदली किंवा बढती होऊ शकते. स्पर्धेत यश मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सरकारी क्षेत्रात अडचणी येतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. स्पर्धेत कठोर मेहनत करावी लागेल. कामानिमित्त प्रवास घडू शकतो.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सरकारी कामात चालढकल नको. कायदेशीर बाबी काळजीपूर्वक पडताळून घ्या. राजकीय यश मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. काही अनपेक्षित सुखाचे क्षण येतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. उपासना लाभदायक ठरेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रेमात यश मिळेल. भागीदारी व्यवसायात नवीन कल्पना राबवल्या जातील. सूचक घटना घडतील.

मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago