शुक्रवार, २३ डिसेंम्बर २०२२
. मार्गशीर्ष अमावस्या, हेमंत ऋतू.
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज अनिष्ट दिवस, दर्श – वेळा अमावस्या.
चंद्र नक्षत्र – मूळ
मेष:- काही अकल्पित घटना घडू शकतात. त्यातून लाभ होतील. राजकीय तत्वांच्या आहारी जाऊ नका. सरकारी कामात चालढकल नको.
वृषभ:- आरोग्य विषयक चिंता निर्माण होऊ शकतात. विश्रांती घ्या. सरकारी कामात अडथळे येतील. कायदे पाळा.
मिथुन:- विरोधक पराभूत होतील. कुलदेवतेची आराधना लाभदायक ठरेल. यश मिळेल. मात्र कामाच्या ठिकाणी वादविवाद संभवतात. अधिक जबाबदारी अंगावर येण्याची शक्यता आहे.
कर्क:- आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायवृद्धी होईल. प्रवासाचे नियोजन बिघडेल. कामाच्या वेळेत बदल होईल.
सिंह:- सौख्य लाभेल. स्पर्धेत यश मिळेल. अभ्यासात प्रगती होईल. शुभ समाचार समजतील. अचानक धनलाभ संभवतो.
कन्या:- हुरहूर वाढेल. कामे रेंगाळतील. अनामिक भीती दाटून येईल. भागीदारीत वितुष्ट येऊ शकते. संयमाने परिस्थिती हाताळा.
तुळ:- सौख्याचा दिवस आहे.कामे मार्गी लागतील. मन आनंदी राहील. उत्साह वाढेल. आरोग्य सांभाळा. खाण्याचे पथ्य पाळा.
वृश्चिक:- विनाकारण वैर करू नका. वादविवाद टाळा. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. छंद जोपासले जातील. नवीन नाती बनतील.
धनु:- प्रगतीचा वेग वाढू लागेल. घरात कुरबुरी होऊ शकतात. वरिष्ठ नाराज होतील. कामाचा ताण वाढेल. विंचू काट्या पासून सावध रहा.
मकर:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहू शकते. उपासना करा. भावंडांशी मतभेद नकोत. घरात काही बदल कराल.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. यश आणि कीर्ती मिळेल. नावलौकिक वाढेल. मन प्रसन्न राहील. सरकारी कामात वादविवाद नकोत.
मीन:- महत्वाची कामे सध्या नकोत. संयमाने घ्या. कामाचा वेग हळूहळू वाढेल. मान सन्मानची अपेक्षा ठेऊ नका. व्यसने टाळा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
ReplyForward
|