सोमवार, २३ जानेवारी २०२३.
मग शुक्ल द्वितीया. शिशिर ऋतू. –
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज अनिष्ट दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा
मेष:- जुनी येणी वसूल होतील. कठोर निर्णय घ्याल. आर्थिक आवक चांगली राहील. उत्तरार्ध अनुकूल आहे.
वृषभ:- सौख्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी सन्मान होईल. सकाळी कामे पूर्ण करा.
मिथुन:- वादविवाद टाळा. मित्रांशी मतभेद नकोत. शत्रूचा त्रास जाणवेल. उत्तरार्ध चांगला आहे.
कर्क:- सकाळी कामे पूर्ण करा. दगदग वाढेल. वाहने जपून चालवा. ध्यानधारणा करा.
सिंह:- व्यवसायात दबदबा राहील यश मिळेल. विरोधक नामोहरम होतील. आर्थिक प्राप्ती होईल.
कन्या:- संमिश्र दिवस आहे. दिवसाची सुरुवात काहीशी संथ होईल. नंतर कामाचा वेग वाढेल.
तुळ:- घरात शांतता ठेवा. शेजाऱ्यांशी वादविवाद होऊ शकतात. ध्यानधारणा लाभदायक ठरेल.
वृश्चिक:- पूर्वार्ध सुखाचा आहे. कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील.
धनु:- एकाच वेळी आनंद आणि तणाव यांचा अनुभव येईल. मोजके बोला. जामीन राहू नका.
मकर:- शत्रू शिरजोर होतील. मत्सरत्रास जाणवेल. संपत्तीचे प्रदर्शन टाळा.
कुंभ:- सुरुवात संथ आहे. कठोर बोलणे टाळा. संयम आवश्यक आहे. संध्याकाळ आनंदाची.
मीन:- पूर्वार्ध चांगला आहे. आहे. कामे मार्गी लागतील. वेळ दवडू नका. संध्याकाळ खर्चात टाकणारी असेल.
.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
ReplyForward
|