३१ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर हर्षल आणि गुरूचा प्रभाव आहे. तुमच्या आयुष्यात अनपेक्षित चढ उतार होतात. तुमचे आयुष्य गतिमान असते. चांगले अनुभव आणि अनुकूल बदल घडतात. तुम्ही झटपट निर्णय घेतात. तुमच्या बुद्धीचा उपयोग मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही करतात. तुम्हाला खोटेपणा आवडत नाही. तुम्ही आकर्षक असतात. संधी मिळाल्यास तुम्ही उत्तम गुणदर्शन करतात. तुम्ही तुमचे विचार इतरांवर लादतात. तुमच्यात आत्मविश्वास असतो. इतरांना तुम्ही सर्वकाही मोकळेपणाने सांगत नाहीत. जीवनात सतत बदल घडावा से तुम्हाला वाटते. मान सन्मान आणि झटपट पैसे कमावणे याकडे तुमचा कल असतो.

तुम्ही हुशार असून स्वभाव विचारी आणि अपुलकीयुक्त असतो. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. शास्त्रीय आणि धार्मिक पुस्तके तुम्हाला आवडतात. चांगली नोकरी मिळते आणि पैसे चांगले कमवतात. वयाच्या ३१ नंतर भाग्योदय होतो. स्वतःच्या भावना तुम्हाला व्यक्त करता येत नाहीत. तुमच्यात चांगले संभाषण चातुर्य असते. तुम्ही काटेकोरपणे काम करतात आणि त्यात तुम्हाला यश मिळते. बुद्धिमान आणि हुशार वर्तुळात वावरणे तुम्हाला आवडते.

तुमचा स्वभाव अस्थिर असतो. तुम्ही अनपेक्षित कृती करतात. भिन्न लिंगी व्यक्तीपासून तुम्हाला फायदा होतो. आयुष्यत मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडतात. कौटुंबिक जीवन सुखाचे असते मात्र मित्र मैत्रिणीची गरज भासते.

धर्मादाय काम करण्यात तुम्हाला आनंद मिळतो. उत्तम स्मरणशक्ती आणि जबर इच्छाशक्ती असते. तुम्ही गरीब दिसतात पण हेकेखोर असू शकतात. तुम्ही सतत वाद घालणे किंवा वैचारिक विरोध करणे टाळले पाहिजे.

व्यवसाय:- इंजिनीअर, बिल्डर, शास्त्रज्ञ, उद्योगपती, बँकिंग, इंटेरिअर डेकोरेटर.

शुभ रंग – निळा, पांढरा, लालसर, राखाडी.

शुभ दिवस: शनिवार, रविवार, सोमवार.

शुभ रत्न:- हिरा, पोवळे, मोती.

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

शुक्रवार, ३१ मार्च २०२३. चैत्र शुक्ल दशमी. वसंत ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

“आज शुभ दिवस” आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.

चंद्र नक्षत्र – पुष्य (दिवसभर)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) स्थावर संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. गूढ उलगडतील. मान सन्मान मिळतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) हातून चांगले लेखन आणि महत्वाचे करार होतील. वेळेत कामे मार्गी लागतील. मौज कराल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सरकारी कामे मार्गी लागतील. कायद्याचा आदर करा. व्यसने टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) गोंधळ संपेल, चित्र स्पष्ट होईल. अडथळे दूर होतील. आत्मविश्वास वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अडचणी येतील. व्यसनातून त्रास जाणवेल. कामाचे योग्य नियोजन करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मनाप्रमाणे कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा. नवीन व्यवसाय सुरू होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जबाबदारी वाढेल. कामाचा ताण जाणवेल. भ्रमंती होईल. नवीन ओळखी होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सुचक घटना घडतील. प्रवासात नवीन ओळखी होतील. नात्यातून लाभ होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. शांत राहणे हिताचे आहे. संयम बाळगा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सरकारी मान मरातब मिळेल. प्रवास घडेल. संवाद कौशल्य कामास येईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गैरसमज दूर होतील. मळभ हटेल. प्रश्न सुटतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. आज कामे उरकून घ्या. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Devyani Sonar

Recent Posts

जिल्हा परिषद गट-गण रचनेचे प्रारूप सादर

चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…

39 minutes ago

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार झाले ‘पोषणदूत’

कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…

43 minutes ago

प्रस्तावित रामवाडीतील पुलाला साइड ट्रॅक; निविदेतून वगळले

उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…

47 minutes ago

लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…

55 minutes ago

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

1 hour ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

1 hour ago