सोमवार, १० एप्रिल २०२३.
चैत्र कृष्ण चतुर्थी/पंचमी. शोभन नाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
“आज व्यतिपात. वर्ज्य दिवस आहे”
मेष:- सौख्य लाभेल. कर्जे मंजूर होतील. महिलांकडून लाभ होतील. कोर्ट कामात दिरंगाई.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. मन शांत ठेवा. आज महत्वाची कामे नकोत.
मिथुन:- मान सन्मान लाभतील. सूचक स्वप्ने पडतील. विरोधक पराभूत होतील. भौतिक सुखात कमतरता जाणवेल.
कर्क:- अनुकूल दिवस आहे. मौल्यवान खरेदी होईल. वाहन सुख मिळेल.
सिंह:- धाडसी निर्णय घ्याल. त्याचा लाभ होईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल.
कन्या:- आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
तुळ:- नात्यातून लाभ होईल. लेखकाना यश मिळेल. उपासना करा.
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.
धनु:- फारशी अनुकूलता नाही. कामे पुढे ढकलली जातील. उदास वाटेल.
मकर:- अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल.
कुंभ:- कामाचा ताण वाढेल. नकळत चूक होऊ देऊ नका. काळजी घ्या.
मीन:- प्रवासात मोठे यश मिळेल. मात्र दगदग वाढेल. उच्च शिक्षणात यश मिळेल.
१० एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुम्ही कामाच्या ठिकाणी जबाबदारीच्या जागा सांभाळू शकतात. आपले प्रत्येक योजना नवीन आणि स्वतंत्र असावी असा तुमचा हट्ट असतो. अनेकदा तुम्ही घाई करतात आणि उतावळेपणा हा अनुभव असतो. तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी लाभलेले आहे. तुम्ही जे अतिउत्तम आहे तेच निवडतात. फारसा अभ्यास न करता देखील तुम्ही इतरांवर प्रभाव पाडू शकतात. तुम्ही हट्टीपणा आणि स्वार्थीपणा टाळला पाहिजे. भिन्न लिंगी व्यक्ती तसेच आई-वडील आणि इतर नात्यातून तुम्हाला आर्थिक लाभ होतात. वयाच्या 45 नंतर तुमचा भाग्योदय होतो. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात वरिष्ठ पदावर जागा लाभते. तुमच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. तुम्हाला प्रतिष्ठा, कीर्ती आणि मान सन्मान लाभतात. तुमचे आरोग्य चांगले असते. तुम्ही सहसा आजारी पडत नाहीत. आणि पडला तर लवकर बरे होतात. इतरांना तुम्ही मदत करतात. मात्र तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. भ्रमंती करण्याचे तुम्हाला आवड असते. तुम्ही वाहन जपून चालवले पाहिजे तसेच आगीपासून धोका संभवतो. तुम्ही कायदा प्रेमी आहात.
व्यवसाय:- कार्यकारी संचालक, बँकिंग, विक्री, पुस्तक विक्रेता, आयात-निर्यात, वृत्तपत्र, इंटरियर डिझाईन, राजदूत, सैन्य, राजकीय क्षेत्र, खनिज संपत्ती, बांधकाम, जमीन.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा.
– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…