मंगळवार, २५ एप्रिल २०२३.
वैशाख शुक्ल पंचमी. वसंत ऋतू. शोभननाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस आहे” *श्री. आद्य शंकराचार्य जयंती, रामनुजाचार्य जयंती* घबाड सकाळी ९.४१ नंतर.
चंद्र नक्षत्र – आर्द्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
मेष:- मान सन्मान मिळेल. समर्थन मिळेल. बौद्धिक चमक दाखवाल. दीर्घकालीन नफ्याचे करार होतील.
वृषभ:- वक्तृत्व बहरेल. कायदेशीर किंवा सामाजिक कार्यासाठी खर्च कराल. कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल.
मिथुन:- सरकारी कामातून लाभ होतील. कायदेशीर कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. धार्मिक यात्रा घडेल.
कर्क:- नोकरीच्या निमित्याने काही खर्च करावा लागेल मात्र त्यातून पुढे फायदा होईल. शेअर्स मध्ये यश मिळेल. स्त्री धनात वाढ होईल. अध्यात्मिक लाभ होतील.
सिंह:- आजचा दिवस भरपूर यश देणारा आहे. आर्थिक प्राप्ती उत्तम होईल. नवीन कार्याची मुहूर्तमेढ होईल. पत्नीकडून उत्तम सहकार्य मिळेल.
कन्या:-  नोकरी/व्यवसायात प्रगती होईल. शासन पुरस्कृत मान सन्मान मिळतील. आर्थिक स्थिती भक्कम होईल.
तुळ:- प्रवासातून आर्थिक लाभ होतील. गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. नावलौकिक वाढेल. ग्रंथ लेखनास चांगला कालावधी आहे.
वृश्चिक:- राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. शेतीची कामे मार्गी लागतील. पत्नीकडून लाभ होतील. पाळीव पशूंची चिंता वाटेल.
धनु:- जनसम्पर्क वाढेल. राजकीय लेखन होईल. आर्थिक लाभ होतील. लॉटरी/ शेअर्स सारख्या माध्यमातून फायदा होण्याची शक्यता आहे.
मकर:- मोजके बोलून लाभ पदरात पडून घ्याल. सासऱ्याकडून लाभ संभवतात. आज महत्वाची कामे पूर्ण करा. जमिनी विक्रीतून फायदा होईल.
कुंभ:- पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. अभिमानास्पद कामगिरी घडेल. प्रवास कार्यसाधक होईल. महत्वाची कागदपत्रे सापडतील.
मीन:- गृहव्यवसायातून लाभ होतील. जंगले/बगीचा यात वावर वाढेल. वाहन सुख मिळेल. खाणी संबंधित व्यवसायात लाभ होतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
Devyani Sonar

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

6 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

13 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

13 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

14 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

14 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

14 hours ago