मेष : धावपळ होईल

या सप्ताहात रवी, बुध अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शुक्र, शनि, राहू, मंगळ, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल.

वृषभ : नोकरदारांना पगारवाढ

या सप्ताहात गुरू शुक्र, शनि, राहू, केतू अनुकल आहेत. रवी, मंगळ, बुध प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते जुळणार नाहीत. कुठलेही धाडस करणे टाळा, शेअरमध्ये लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिथुन : खर्च वाढतील

या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती अडचणींची राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणीतून वाटचाल करावी लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृध्दी प्राप्त होईल. प्रकृतीची काळजी घ्या.

कर्क : दिलासा मिळेल

या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. मंगळ गुरू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र असली तरी दिलासा मिळेल. अचानक पैशांची आवक वाढेल. शेअरमध्ये लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांचे मार्ग सुकर होतील.

सिंह : भाग्योदय होईल

या सप्ताहात बुध, गुरू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शुक्र, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. पैशांसाठी धावपळ करावी लागेल. अडचणीतून मार्ग सापडतील. नोकरदारांच्या चुका अंगावर येतील. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. शेअरमध्ये गुंतवणूक टाळा.

कन्या : आर्थिक लाभाची शक्यता

या सप्ताहात रवी, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांना कामाचा ताण वाढेल. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही.

तूळ : आर्थिक परिस्थिती सुधारेल

या सप्ताहात बुध, गुरू अनुकूल आहेत. दि. 14 मे पासून भाग्यस्थानात येणारा गुरू भाग्योदय घडविणारा ठरेल. नवीन प्रेरणा देईल. रवी, मंगळ, शुक्र, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी संयम ठेवावा. वाद टाळावे. अकारण संघर्ष अंगावर येईल.

वृश्चिक : आर्थिक लाभ

या सप्ताहात बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, गुरू, मंगळ प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना कष्ट सोसावे लागतील. व्यापारी, व्यावसायिकांचा व्यवसाय प्रयत्नपूर्वक वाढवावा लागेल. आरोग्यप्रश्न सतावतील.

धनु : यशप्राप्ती होईल

या सप्ताहात गुरू, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नवनवीन कल्पना सुचतील. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील.

मकर : प्रश्न सुटतील

या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या नवीन योजना लाभदायक ठरतील. वारसा हक्कांचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहील.

कुंभ : हितशत्रूंपासून सावधान

या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांविरुध्द हितशत्रू षडयंत्र रचतील. अत्यंत सावध राहून विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष पुरविणे गरजेचे ठरेल. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृद्धी होईल.

मीन : मानसिक अस्वस्थता

या सप्ताहात रवी, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे वसूल होतील. खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता राहील. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना धनप्राप्ती होईल.

Gavkari Admin

Recent Posts

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…

9 hours ago

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर   उपचार सुरू मोखाडा:   …

13 hours ago

आधी प्रेम… मग लिव्ह इन अन नंतर …

आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…

17 hours ago

दिंडोरी जवळ भीषण अपघातात सात जण ठार

  दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…

23 hours ago

प्रेम अन साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी… प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…

3 days ago

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे

नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…

3 days ago