मंगळवार, २४ मे २०२२. वैशाख कृष्ण नवमी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. 

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज चांगला दिवस आहे ” घबाड सकाळी १०.४६ नंतर रात्री १०.३३ पर्यंत. आज ‘विष्काम्भ’ योग आहे.

चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात. राजकीय भाष्य कटाक्षाने टाळा. रोजची कामे पूर्ववत चालू ठेवा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम लाभाचा दिवस आहे. अधिकार गाजवाल. कामात प्रगती होईल. संध्याकाळ आनंदाची.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामात चालढकल नको. अचानक धनलाभ होऊ शकतो. संमिश्र दिवस आहे. प्रवास घडतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्यदायी दिवस आहे. मन शांत ठेवा. राजकीय वादविवाद टाळा. संध्याकाळ समाधानाची आहे.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तरार्ध अनुकूल नाही. महत्वाची कामे आज नकोत. कुलदेवतेची उपासना करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. क्रोध आवरा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अडथळे दूर होतील. मार्ग सापडेल. यश मिळेल. उत्तरार्ध आर्थिक लाभाचा आहे.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. अडचणींवर मात करा. घरात कुरबुरी होऊ शकतात.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महत्वाची कामे सकाळच्या सत्रात पूर्ण करा. मातेकडून लाभ होतील. छोटी भ्रमंती घडेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम लाभ होतील. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. काही वाडविवादाचे प्रसंग येऊ शकतात. संयम ठेवा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सद्गुरू सान्निध्य लाभेल. अध्यात्मिक उन्नती होईल. लाभदायक दिवस आहे. प्रवासातून लाभ होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल नाही. संयम ठेवा. अध्यात्मिक उन्नतीस उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील.

 मंगेश पंचाक्षरी 

Devyani Sonar

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

2 days ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

2 days ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

2 days ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

2 days ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

2 days ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

2 days ago