बुधवार, १ जून २०२२. जेष्ठ शुक्ल द्वितीया. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

“आज उत्तम दिवस आहे” आज ‘शूल’ योग आहे.

चंद्र नक्षत्र: मृग
चंद्र – केंद्र – मंगळ
चंद्र – केंद्र -गुरू
चंद्र – लाभ- शुक्र

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामे रेंगाळतील. कोर्ट कामात अपयश येऊ शकते. आर्थिक व्यवहार जपून करा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कलाकारांना यश मिळेल. मौल्यवान खरेदी होईल. वादविवाद टाळा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मनोबल वाढेल. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कुरबुरी होऊ शकतात.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) महत्वाची करार करताना काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य सांभाळा. वाहन जपून चालवा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूलता आहे. महत्वाची कामेआज पूर्ण करा. चैनीवर खर्च कराल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामे करताना अपेक्षित परिणाम मिळणार नाही. वाट बघावी लागेल. आर्थिक बाबतीत सावध रहा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रवासात काळजी घ्या. जेष्ठ व्यक्तिंसाठी वेळ द्यावा लागेल. काही कोडे उलगडतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उष्णतेचे विकार जाणवतील. हातून चुकीची कृत्ये होऊ शकतात. आज काळजी घेतली पाहिजे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आवडत्या कामासाठी वेळ द्याल. जोडीदाराला समजून घ्याल. भागीदारी व्यवसायात आज वाद संभवतात.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. व्यावसायिक प्रगती होईल. रुबाब वाढेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गूढ अनुभव येतील. ज्योतिष शास्त्राची आवड निर्माण होईल. मन दोलायमान होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वाहन सुख मिळेल. जवळचे आप्त भेटतील. मन आनंदी राहील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago