राशिभविष्य

गुरूवार, ९ जून २०२२.

जेष्ठ शुक्ल नवमी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १.३० तर दुपारी ३.००

“आज अनिष्ट दिवस *महेश नवमी* आहे”

चंद्रनक्षत्र: हस्त . आज ‘व्यतिपात’ योग आहे.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभाचा दिवस आहे. आनंदी राहाल. मनासारखी कामे होतील. मात्र खर्चात वाढ होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे निर्णय आज नकोत. संयम महत्वाचा आहे. अधिकाराचा लाभ मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. कामे मार्गी लागतील. प्रवासात मात्र त्रास संभवतो.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन कोलमडेल. काळजी घ्या. कौटुंबिक मतभेद संभवतात.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) छोटे प्रवास घडतील. चैनीवर खर्च कराल. मन प्रसन्न राहील. जोडीदाराशी वादविवाद होऊ शकतात.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) काळजी वाढवणारा दिवस आहे. छंद जोपासा. मनाने स्थिर रहा. आरोग्य सांभाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. मनासारखी कामे होतील. धाडसी निर्णय घ्याल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. दूरचे नातेवाईक भेटतील. घरात शांतता ठेवा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. अभ्यासात यश मिळेल. शेअर्समध्ये सांभाळून गुंतवणूक करा. नुकसान संभवते.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काळजी घेणे आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. वाहन जपून चालवा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यक्त व्हाल. मन मोकळे कराल. आनंदी राहाल. क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago