शनीवार, ९ जुलै २०२२.
आषाढ शुक्ल दशमी. ग्रीष्म ऋतू. दक्षिणायन. शुभकृत नाम संवत्सर.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे . आज सकाळी ६.४८ पर्यंत ‘सिद्ध’ योग आहे, त्यानंतर ‘साध्य’ योग आहे.
चंद्र नक्षत्र – स्वाती (सकाळी ११.२५ पर्यंत)
मेष:- अनपेक्षित लाभ होतील. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुक तरुणांना खुश खबर मिळेल.
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मात्र लॉटरी, सट्टा, जुगार, शेअर्स टाळा. सरकारी कामातून नुकसान संभवते.
मिथुन:- येणी वसूल होतील. संशोधनात यश मिळेल. मेहनत वाढवावी लागेल.
कर्क:- गृहसौख्य लाभेल. प्रतिष्ठा पणाला लागेल. घेणेकरी तगादा करतील.
सिंह:- आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. भावंड मदत करतील. प्रेमात अपयश.
कन्या:- कलाकारांना यश मिळेल. आरोग्य सुधारेल. व्यसने आणि प्रलोभने टाळा.
तुळ:- जोडीदार खुश राहील. प्रेमात यश मिळेल. संशय कल्लोळ टाळा.
वृश्चिक:- जुने दुखणे डोके वर काढेल. आरोग्यावर उधळपट्टी होऊ शकते. काळजी घ्या.
धनु:- उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. अनपेक्षित घटना घडतील.
मकर:- कामाच्या ठिकाणी मन रमेल. कामे पार पडतील. मान सन्मान मिळतील.
कुंभ:- प्रवास कार्यसाधक होतील. अचानक धनलाभ संभवतो. दिवस संमिश्र आहे.
मीन:- विश्रांतीची गरज भासेल. पाळीव प्राणी पासून काळजी घ्या. घसा दुखू शकतो.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…