शुक्रवार, १५ जुलै २०२२.
आषाढ कृष्ण द्वितीया. दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू,
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
चंद्रनक्षत्र श्रवण (संध्याकाळी ५.३१ पर्यंत)
आज शुभ दिवस, ‘प्रीती’ योग आहे.
मेष:- स्वप्नरंजन करण्यात मन रमेल. कामात उत्साह जाणवेल. आनंदी अनुभव येतील. आरोग्य सांभाळा. प्रतिष्ठा जपावी लागेल.
वृषभ:- तीर्थयात्रा घडेल. आप्त भेटतील. प्रवासात समाधानकारक अनुभव येतील. आध्यत्मिक लाभ होतील.
मिथुन:- मानसिक क्लेश जाणवतील. शक्यतो आराम करणे हिताचे आहे. अनामिक भीती दाटून येईल.
कर्क:- प्रेमी जनांना खुशखबर मिळेल. आनंदी वातावरण राहील. नवीन ओळखी होतील. कष्टाचे फळ उशिरा पण चांगले मिळेल.
सिंह:- पोटाचे विकार संभवतात. काळजी घ्या. अतिरेक नको. आर्थिक लाभ होतील मात्र खर्चात वाढ होईल.
कन्या:- शेजाऱ्यांशी सुसंवाद साधा. गूढ विद्यांचा अनुभव येईल. फारसे कामकाज होणार नाही.
तुळ:- घराजवळील व्यक्तींचा काहीसा त्रास जाणवेल. संयम आणि शांतता आवश्यक आहे. मौल्यवान खरेदी होईल.
वृश्चिक:- आप्त भेटतील. विचार प्रवर्तक चर्चा होईल. मार्ग मोकळे होतील.
धनु:- हट्टाग्रही भूमिका टाळणे हिताचे आहे. विशेषतः नात्यात कटुता येऊ देऊ नका. शब्द जपून वापरा. प्रतिष्ठासाठी खर्च कराल.
मकर:- मेजवानीच योग आहेत. आनंदी राहाल. प्रसन्न दिवस आहे. यशस्वी कालावधी आहे.
कुंभ:- त्रागा करून घेणे टाळा. मनासारख्या घटना घडल्या नाहीत तरी हरकत नाही. लवकरच परिस्थिती बदलेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
मीन:- आनंद आणि उत्साह यांचा सुरेख मेळ आहे. शुभ समाचार समजतील. नवीन सुरुवात कराल.
. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…
जमीन खंडणी प्रकरणी सातपुर पोलिसात गुन्हा सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर परिसरात खंडणी व…