बुधवार, २० जुलै २०२२
आषाढ कृष्ण, सप्तमी/अष्टमी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे ” आज ‘सुकर्मा’ योग आहे.
चंद्रनक्षत्र: रेवती
मेष:- आपत्ती येऊ शकते. सरकारी कामात घोळ नको. कायद्याचे योग्य पालन करा.
वृषभ:- पूर्वार्धात कामे मार्गी लागतील. स्वप्ने साकार होतील. कष्टाचे चीज होईल.
मिथुन:- कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. सौख्य लाभेल. प्रगतीचा वेग वाढेल. उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे.
कर्क:- बोलण्यातून गैरसमज होतील. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
सिंह:- पूर्वार्ध आळसात जाईल. आरोग्य सांभाळा. वाहन अतिशय जपून चालवा.
कन्या:- सोबत काम करणाऱ्या लोकांकडून त्रास संभवतो. चोरीचे भय आहे. पूर्वार्धात कामे पूर्ण करा.
तुळ:- अनुकूल दिवस आहे. अधिकाराचा योग्य वापर कराल. आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक:- छोटे प्रवास घडतील. वक्तृत्व गाजवाल. विरोधक पराभूत होतील. मत्सर त्रास जाणवेल.
धनु:- सोसायटीत वादविवाद टाळा. क्रोध आवरा. सोबत्यांशी संवाद साधावा लागेल.
मकर:- आर्थिक प्रगती चांगली होईल. मात्र जपून पावले टाका. चुकीचे निर्णय होऊ शकतात.
कुंभ:- चंद्राचा शनिशी लाभ योग आहे तर उत्तरार्धात चंद्राचा बुधाशी केंद्र योग होणार आहे. दीर्घकालीन फायदा होईल वाहन जपून चालवा.
मीन:- अति आत्मविश्वास टाळावा. संवादातून कामे होऊ शकतील. नम्रता बाळगा.
मंगेश पंचाक्षरी –
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…