रविवार, ३१ जुलै २०२२.
श्रावण, शुक्ल तृतीया. दक्षिणायन, वर्षा ऋतू,शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस, ‘वरिया योग’ गभस्ती सूर्याचे मौनाने पूजन करावे.
चंद्र नक्षत्र – मघा (दुपारी २.२० पर्यंत)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मान सन्मान मिळतील. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. काळजीपूर्वक निर्णय घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मानसिक सौख्य लाभेल. जमिनीची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. दबदबा वाढेल. आर्थिक लाभ होतील. व्यसने टाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वक्तृत्व बहरेल. नेतृत्व गुण उदयास येतील. कलाकारांना त्रास संभवतो. प्रवासात काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आत्मविश्वास वाढलेला आहे. अडचणी दूर होतील. कामे मार्गी लागतील. भौतिक सुखे टाळावीत.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूलता नाही. चोरीचे भय आहे. वाहने जपून चालवा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मान मरातब वाढेल. कीर्ती दिगंत पसरेल. उत्तम कालावधी आहे. सरकारी कामात यश मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अधिक काम करावे लागेल. उद्योग व्यवसायात अचानक काही समस्या येऊ शकते. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उच्च शिक्षण संबंधित कामे मार्गी लागतील. अकल्पित धन प्राप्त होऊ शकते. गूढ स्वप्ने पडतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विश्रांतीची गरज आहे. लोभी सहकार्यांपासून सावध रहा. भलते साहस नको.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कुटुंबिक सुख लाभेल. शब्दास मान मिळेल. धन वाढेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. व्यवसायात यश मिळेल. येणी वसूल होतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –