राशी भविष्य

शुक्रवार, १९ ऑगस्ट २०२२.

श्रावण कृष्ण अष्टमी. वर्षा ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर.

राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

आज अनिष्ट दिवस *गोपाळकाला, कालाष्टमी* ‘ध्रुव’ योग.

चंद्र नक्षत्र – कृतिका

मेष:- प्रतिष्ठा सांभाळा. खर्चाचे नियोजन करा. उपासना लाभदायक ठरेल.

वृषभ:- पैशाचे सोंग आणता येत नाही हे लक्षात असू द्या. मोठ्या कामात हात घालताना योग्य सल्ला घ्या.

मिथुन:- दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. वाहने जपून चालवा.

कर्क:- उत्तम दिवस आहे. सौख्य लाभेल. आनंदी राहाल.

सिंह:- कामानिमित्त दूर जावे लागेल. मनःशांती ढळू शकते. उपासना करा.

कन्या:- संमिश्र दिवस आहे. फारसे अनुकूल वातावरण नाही. घाई नको.

तुळ:- दिवस थकवा आणणारा आहे. विश्रांतीची गरज भासेल. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक:- प्रगती चालूच आहे. विजयी व्हाल. शत्रू पराभूत होतील.

धनु:- धनलाभ होईल. मार्ग सापडेल. नवनवीन कल्पना सुचतील.

मकर:- आज अनुकूलता नाही. प्रतिष्ठा पणाला लागेल. दिलेल्या शब्दाला जागणे अवघड होईल.

कुंभ:- मानसिक कुचंबणा होऊ शकते. सहनशक्तीची परीक्षा होईल. ध्यानधारण करा. आरोग्य सांभाळा.

मीन:- अधिकारावर आक्रमण होऊ शकते. कठोर बोलणे टाळा. सध्या मोठे निर्णय नकोत.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *